ETV Bharat / state

इतिहासात पहिल्यांदाच गडचिरोलीतील 'मार्कंडादेव' यात्रा रद्द

author img

By

Published : Mar 11, 2021, 12:43 PM IST

first-time-in-history-markandadev-yatra-in-gadchiroli-is-canceled
इतिहासात पहिल्यांदाच गडचिरोलीतील 'मार्कंडादेव' यात्रा रद्द

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच ही यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

गडचिरोली - विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच ही यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. भाविकांनी गर्दी करू नये, यासाठी चामोर्शी तालुका प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रिपोर्ट

उत्तरवाहिनी वैनगंगा नदी तिरावर हेमाडपंती मंदिर -

मार्कंडादेव येथे वैनगंगा नदी वाहते. ही नदी येथे उत्तरवाहिनी असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. नदीच्या काठावर अतिशय पुरातन महादेव मंदिर आहे. तसेच येथे अनेक देवदेवतांचे मंदिर आहे. त्यामुळे अनेक भाविक पूर्वजांच्या नावे वैनगंगा नदीमध्ये पवित्र स्नान करून मंदिरात दर्शनासाठी येतात.

लाखो भाविकांची असते रेलचेल -

मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त पंधरा दिवस यात्रा भरते. यात्रेमध्ये विदर्भासह लगतच्या छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश राज्यातील लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांच्या मनोरंजनासाठी येथे विविध साहित्याची दुकाने तसेच मनोरंजनाची साधने लागतात. त्यामुळे यात्रेच्या माध्यमातून पंधरा दिवस अनेकांना रोजगार मिळत असतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द -

सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कोरोना हातपाय पसरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील मार्कंडादेव तसेच चपराळा या दोन्ही यात्रा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे मार्कंडादेव मंदिर 20 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरामध्ये कोणत्याही भाविकांना प्रवेश नाही.

तीनही मार्गावर पोलीस बंदोबस्त -

मार्कंडादेव यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तीनही मार्ग बंद करण्यात आले आहेत. तीनही मार्गावर पोलीस चौकी लावून भाविकांना अडवले जात आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गजबजून राहणाऱ्या मार्कंडामध्ये पूर्णता शुकशुकाट दिसून आला.

हेही वाचा- महाशिवरात्रीला यंदा वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर राहणार बंद; भाविकांचा हिरमोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.