Prakash Amte: कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले; नागरिकांकडून जोरदार स्वागत

author img

By

Published : Sep 7, 2022, 4:29 PM IST

Etv Bharat

जिल्ह्यतील अतिदुर्गम हेमलकसा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमामतून निरंतर जनतेचे आरोग्य संभाळणारे डॉक्टर प्रकाश आमटे मागील तीन महिने रुग्णालयात होते. (Doctor Prakash Amte) त्यांच्यावर कर्करोगासंदर्भात उपचार सुरू होते. त्यातून ते आता पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

गडचिरोली - जिल्ह्यतील अतिदुर्गम हेमलकसा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमामतून निरंतर जनतेचे आरोग्य संभाळणारे डॉक्टर प्रकाश आमटे मागील तीन महिने रुग्णालयात होते. त्यांच्यावर कर्करोगासंदर्भात उपचार सुरू होते. (Doctor Prakash Amte returns to Hemalkasa after beating cancer) त्यातून ते आता पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले
कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले
कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले
कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले
कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले

विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला - यंदाच्या जून महिन्यात पुणे प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. चाचण्यादरम्यान त्यांना कर्करोगाचे निष्पन्न झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयाच्या चमूने उपचार सुरू केले होते. याचदरम्यान उपचार कक्षात फिरत असताना कोसळल्याने त्यांचे हाताच्या हाड देखील मोडले होते. (Doctor Prakash Amte returns to Hemalkasa) या दोन्ही संकटांवर मात करत डॉक्टर प्रकाश आमटे दीर्घ कालावधीनंतर लोक बिरादरी प्रकल्पात परतताच डॉक्टर प्रकाश व डॉक्टर मंदा आमटे यांचे प्रकल्पातील कार्यकर्ते व शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. डॉक्टर प्रकाश भाऊंनी यांनी देखील प्रकल्पातील कार्यकर्ते व शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले
कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसाला परतले

प्रकाश आमटे यांनी नागरिकांशी संवाद साधला - प्रथमच आमटे परिवार नसतांना या कठीण समयी प्रकल्प व आमटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे आमटे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टर प्रकाश भाऊंना थकवा जाणवत असूनही आठ दहा किलो वजनही कमी झाले. त्यांना आजही निसर्गावरच अधिक विस्वास आहे. त्यांनी आज पहाटेच बाजूच्या भागात फेरफटका मारला. तीन महिन्यानंतर भामरागड वासीयांशी प्रकाश आमटे यांनी काही काळ संवादही साधला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.