ETV Bharat / state

दिलासादायक! गडचिरोलीत 141 जणांनी केली कोरोनावर मात

author img

By

Published : Jun 3, 2021, 9:22 PM IST

कोरोना
कोरोना

सद्या 587 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण 723 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.99 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाले आहे.

गडचिरोली - जिल्ह्यात 38 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. तसेच आज (गुरुवारी) 141 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 29503 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28193 वर पोहचली आहे. सद्या 587 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण 723 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.99 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाले आहे.


नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, आरमोरी 04, भामरागड तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 062, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 08, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 07 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 141 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 37, अहेरी 25, आरमोरी 05, चामोर्शी 30, धानोरा 06, एटापल्ली 09, मुलचेरा 07, सिरोंचा 11, कोरची 02, कुरखेडा 05 तसेच वडसा येथील 04 जणांचा समावेश आहे.

म्यूकरमायकोसिसच्या 7 रूग्णांचे निदान

जिल्ह्यातील संशियीत म्यूकरमायकोसिसचे 4 रूग्ण नागपूर येथे पाठवण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे उपचार घेत होते. त्यांची तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांचे त्या त्या ठिकाणी उपचार सुरू होते. त्यातील 58 वर्षीय गडचिरोली शहरातील एकजणाने म्यूकरमायकोसिसवर मात केली आहे. दोन रुग्ण चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. दोन मृत्यूंमध्ये कोरची येथील 50 वर्षीय पुरूष व चामोर्शी तालुक्यातील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.


हेही वाचा -वृक्षप्रेमींनी केली वृक्षावर शस्त्रक्रिया; बुडापासून तोडलेले झाड पुन्हा केले उभे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.