ETV Bharat / state

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात, तीन जणांचा मृत्यू

author img

By

Published : May 17, 2022, 12:41 PM IST

three killed in triple accident on mumbai agra national highway near dhule
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात तीन जणांचा मृत्यू

या भीषण अपघातात क्रुझर आणि रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमी हे पारोळा तालुक्यातील तरडी येथील असल्याचे सांगितले जात असून या अपघातात महेंद्र पाटील,सरलाबाई सोनवणे आणि रिक्षाचालक रईस शेख यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धुळे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास तिहेरी अपघात घडला. या अपघातात भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला धडक दिली. तर यादरम्यान क्रुझर वाहन या दोन्ही वाहनांना जाऊन धडकली. या भीषण अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर नऊ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यात रिक्षा आणि क्रुझर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. महेंद्र पाटील, सरलाबाई सोनवणे आणि रिक्षाचालक रईस शेख असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

तिहेरी अपघात - मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. धुळे जवळील फॅमिली ढाब्या जवळ मित्र नगर परिसरात भीषण अपघात झाला आहे. मालेगावकडून कांदा घेऊन मध्यप्रदेश घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरील ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघात दरम्यानच क्रुझर वाहन या अपघातग्रस्त ट्रक व रिक्षाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात क्रुझर आणि रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमी हे पारोळा तालुक्यातील तरडी येथील असल्याचे सांगितले जात असून या अपघातात महेंद्र पाटील,सरलाबाई सोनवणे आणि रिक्षाचालक रईस शेख यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.क्रेनच्या साहाय्याने रात्री तीनही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करण्याचे कार्य रात्री उशिरा सुरु होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.