Uday Samant Vs Uddhav Thackeray उदय सामंत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे समर्थकांची धुळ्यात घोषणाबाजी

author img

By

Published : Aug 28, 2022, 6:54 AM IST

Uday Samant Vs Uddhav Thackeray

Uday Samant Vs Uddhav Thackeray उद्योग मंत्री उदय सामंत Uday Samant हे धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. मंत्री सामंत यांची दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात Dhule Collectorate Offices आढावा बैठक होती. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray समर्थकांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी करणाऱ्या ४० आमदारांच्या विरोधात घोषणा दिल्यात आहेत.

धुळे उद्योगमंत्री उदय सामंत Uday Samant हे धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. मंत्री सामंत यांची दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात Dhule Collectorate Offices आढावा बैठक होती. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray समर्थकांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी करणाऱ्या ४० आमदारांच्या विरोधात घोषणा दिल्यात आहेत. ५० खोके एकदम ओके असे लिहलेले कपडे लावून ठाकरे समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शरद पाटील, धीरज पाटील, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. धुळे शहर पोलिसांनी Dhule City Police आंदोलन करणाऱ्या या उद्धव ठाकरे समर्थकांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले आहे.

सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न काही आठवड्यापूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये कथित शिवसेना समर्थकांनी हल्ला केले होते. त्यानंतर आज पुन्हा धुळ्यामध्ये हा शिवसैनिकांनी सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uday Samant Vs Uddhav Thackeray

उदय सामंत यांचा होणार सत्कार माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी ज्या कात्रज चौकात हल्ला केला. त्याच ठिकाणी आता शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उदय सामंत यांचा सभा घेऊन सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

आदित्य ठाकरे यांची सभा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये वारंवार शाब्दिक संघर्ष आणि टीका होत होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात असताना आणि त्याच वेळेस कात्रज चौक भागामध्ये युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा झाली.

हेही वाचा Sonali Phogat Murder Case सोनाली फोगट खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, ड्रगचा झाला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.