ETV Bharat / state

Navratri 2022 : २५० कुळांची कुलदैवत आहे धुळ्याची एकविरा देवी, जाणून घ्या एकविरा देवी

author img

By

Published : Oct 2, 2022, 12:56 PM IST

Navratri 2022
खान्देशची कुलस्वामिनी

खान्देशची कुलस्वामिनी (Kulaswamini Dhule of Khandesh) एकविरा देवी (Legend of Ekvira Devi) २५० कुळांची कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील जागृत पाचवं शक्तीपीठ म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं. या मंदिराला पाचशे वर्षाचा इतिहास असल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. सन १९८७ मध्ये या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. एकविरा देवी मंदिरातील यंदाच नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर येथील शंकराचार्य करवीरपिठाचे जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते यंदा देवीची पूजा करण्यात आली.Navratri 2022

धुळे : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदी काठावर देवपूर भागात एकविरा देवी मंदिर आहे. हेमाडपंथीय, पूर्वाभिमुखी हे मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. आजही मंदिराच्या आवारात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पायऱ्यांची जिवंत विहीर आहे. खान्देशची कुलस्वामिनी (Kulaswamini Dhule of Khandesh) एकविरा देवी (Legend of Ekvira Devi) २५० कुळांची कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील जागृत पाचवं शक्तीपीठ म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं. या मंदिराला पाचशे वर्षाचा इतिहास असल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. सन १९८७ मध्ये या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी येथील प्राचीन विहीरवरून बंद करण्यात आलीय. मात्र या विहिरीचा उपयोग आजही होतोय. एकविरा देवी मंदिरातील यंदाच नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर येथील शंकराचार्य करवीरपिठाचे जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते यंदा देवीची पूजा करण्यात आली.Navratri 2022


नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर २४ तास उघडं राहणार : शारदीय नवरात्रोत्सव, शतचंडी महायज्ञ, कुमारिका पूजन, कोजागिरी पौर्णिमा, चैत्र नवरात्रोत्सव तसेच चैत्र पौर्णिमा या दिवशी एकविरा देवीची मोठ्या पितळी रथातून शोभायात्रा, यात्रोत्सव, तसेच दर पौर्णिमेला एकविरा देवीची पालखी असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन असतं. कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्ष सण, उत्सव साजरे करण्यावर देखील निर्बंध होते. आता हे निर्बंध हटवल्यामुळे भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. मंदिरात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनानं नवरात्रोत्सवात मंदिर २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रतिक्रिया देतांना एकविरा देवी मंदीराचे विश्वस्त



एकविरा देवी मंदिराचे ऐतिहासिक महत्व : खानदेशची कुलस्वामिनी तसेच महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ म्हणून धुळे शहरातील श्री एकवीरादेवी मंदिराची ओळख आहे. देवपूरमध्ये पांझरा नदीकिनारी असलेले एकवीरा देवी आणि रेणुकामाता मंदिर पूर्वापार गुरव घराण्याच्या वहिवाटीत होते. मंदिराच्या सध्याच्या विश्वस्तांच्या माहिती नुसार सुमारे पाचशे वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. मंदिर पूर्वाभिमुखी, हेमाडपंथी, प्राचीन आहे. एकवीरादेवी, रेणुकामाता आदिशक्ती श्री पार्वतीची रूपे मानली जातात. त्यांनी वेगवेगळे अवतार घेत असुरी शक्तींचा नाश केला. रेणुकामातेचा पुत्र परशुराम यांच्या नावावरून भगवतीला एकवीरा देवी असं म्हणतात.



अशी आहे मंदिराची रचना : मंदिराच्या पूर्व दर्शनी भागावर दीपस्तंभ आहे. मूर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूर लेपन असून, पद्मासनी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूर लेपनाची मूर्ती आहे. मंदिर पूर्व-पश्‍चिम १३२ फूट, दक्षिणोत्तर ११५ फूट, उंची १५ फूट असून, शिखराची उंची २७ फूट आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडी दरवाजा आहे. त्यावर नगारखाना आहे. परिसरात शितलामाता, खोकलीमाता, परशुराम, हनुमान, विठ्ठल-रुक्‍मिणी, महादेवाचे मंदिर आहे. पश्‍चिमेस महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्या काळी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून परिसरात खोदलेली पायविहीर आजही जिवंत आहे. १९५५ मध्ये ट्रस्टची स्थापना झाली. भाविकांच्या सहकार्याने १९६७ तसेच १९८७ मध्ये टप्पाटप्प्याने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ट्रस्टतर्फे १९८८ मध्ये मंदिराचे सुशोभीकरण झाले. संकट दूर करीत मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे, आख्यायिका आहे.



विविध उत्सवांचे आयोजन : मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम होतात. चैत्रात यात्रा भरते, तेव्हा अनेक भाविक नवसपूर्ती, कुळधर्म, जावळं काढण्यासाठी येतात. यात्रेपूर्वी देवीची पालखी, शोभायात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. दर पौर्णिमेला मंदिराच्या आवारात पालखी निघते. मंदिरात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, आषाढी एकादशी, श्रावणमास, गणेश चतुर्थी, शारदीय नवरात्रोत्सव, ललितापंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक स्नान, नरक चतुर्दशी, कार्तिकी एकादशी, अष्टमी, त्रिपुरारी पौर्णिमा, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, शितलामाता उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. दिनविशेष लक्षात घेऊन अभिषेक, सप्तशती पाठ, रुद्राभिषेक आदी कार्यक्रम होतात. मंदिरात शाश्‍वत अभिषेकाची योजना सुरू आहे.


२५० कुळांची कुलदैवत : धुळ्याची एकविरा देवी २५० कुळांची कुलदैवत आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान तसेच विदेशातून देखील भाविक येतात.Navratri 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.