ETV Bharat / state

Dhule Crime: यशवंत बागुल खुनाचा 24 तासाच्या आत तपास, मामाची दोन्ही मुलेच निघाली मारेकरी

author img

By

Published : May 27, 2023, 9:48 PM IST

Dhule Crime
यशवंत बागुल खुनाचा 24 तासाच्या आत तपा

धुळे जिल्ह्यातील उभंड नाद्रे गावाजवळ झालेल्या खुनाच्या घटनेचा धुळे पोलीस पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला आहे. धुळे शहरात राहणाऱ्या यशवंत बागुल यांचा तीन गोळ्या झाडत अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नेमका कोणी व का केला हे स्पष्ट झाले आहे. यशवंत बागुल यांच्या मामाची दोन्ही मुलेच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

धुळे : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष यशवंत बागुल यांच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास लावला आहे. यशवंत बागुल यांच्या मामाची दोन्ही मुलेच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुरूवारी रात्री सव्वाआठच्या सुमाराला हा खून झाला होता. कुटूंबाला मानसिक त्रास देत असल्याचे कारण या खुनामागे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यशवंत बागुल यांचा खून : पंकज राजेंद्र मोहिते आणि आनंद लक्ष्मण मोहिते (दोन्ही रा. उभंड नांद्रे, ता. धुळे) अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. त्यापैकी पंकज मोहिते यांच्या दुचाकीवर बसूनच यशवंत बागुल हे नांद्रे येथून पिंपरखेड गावाला मजुरांच्या शोधासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पिंपरखेड घाटात पंकज मोहिते आणि दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या आनंद मोहिते या दोघांनी गावठी पिस्तूल आणि चाकूच्या साह्याने यशवंत बागुल यांचा खून केल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. दोन्ही संशयतांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यशवंत बागुल यांच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास लावला आहे. यशवंत बागुल यांच्या मामाची दोन्ही मुलेच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले, दोन्ही संशयतांनी गुन्ह्याची कबुली दिली. - पोलीस अधीक्षक संजय बारकुंड


पिंपरखेडा घाटात घडली घटना: धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. यशवंत सुरेश बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात शेती आहे. शेतात डाळींब फळबाग आहे. डाळींब झाडाच्या फांद्यांना बांबू लावून सरळ उभे करण्याच्या कामासाठी उभंड नांद्रे गावात मजूर मिळत नसल्याने, यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते.

गावठी पिस्तूलने गोळी झाडली: यशवंत बागुल हे त्यांच्या मामांचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलीवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते. दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी 'अण्णा थांब' असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी इसम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते. काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली.

यशवंत बागुल यांच्यावर चाकूने वार: दुसऱ्या इसमाने खिशातून चाकू काढून गळ्यावर, गळ्याच्या खाली छातीवर तसेच उजव्या हाताच्या काखेत चाकूने सपासप वार केले. हा भयावह प्रसंग पाहून यशवंत बागुल यांच्या मामाचा मुलगा पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला. घडलेली घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर सर्व नातेकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने यशवंत बागुल यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री एक वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यशवंत बागुल यांची पत्नी आशाबाई बागुल (वय 34 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ अन्वये खुनाचा आणि इतर कलमान्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -

Dhule Crime शेतमजूर शोधायला निघाला अज्ञातांनी गोळ्या झाडून केला खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.