धुळ्यात आयएमएच्या डॉक्टरांचे आंदोलन, डॉक्टरांवरील हल्ला रोखण्यासाठी कायद्याची मागणी

author img

By

Published : Jun 18, 2021, 3:56 PM IST

dhule

डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज डॉक्टरांनी आंदोलन केले. धुळ्यातही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने आंदोलन करण्यात आले. 'केंद्र सरकारने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत. त्यासाठी कायदा करावा', अशी मागणी यावेळी आंदोलक डॉक्टरांनी केली.

धुळे - कोरोनाच्या महामारीमध्ये दीड हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. मात्र डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने धुळ्यात आंदोलन करण्यात आले.

धुळ्यात आयएमएच्या डॉक्टरांचे आंदोलन

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

केंद्र सरकारने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी डॉ. रवी वानखेडकर यांनी केली. धुळे शहरासह जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. संपूर्ण देशात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात निषेध दिवस पाळण्यात आल्याचे डॉक्टर वानखेडकर यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेला बदनाम करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी यावेळी आयएमएने केली.

आंदोलक डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या

  • डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा. या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहे, फक्त गृहमंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो त्वरित पारित करण्यात यावा. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत येईल.
  • सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात.
  • रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे.
  • अशा हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालवावे.

हेही वाचा - अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; 'हे' आहेत खलनायक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.