ETV Bharat / state

Dhule Crime : चार गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त, साताऱ्याच्या दोन संशयितांना धुळ्यात पकडले

author img

By

Published : Jul 21, 2023, 10:31 PM IST

Dhule Crime
चार गावठी पिस्तूल पकडले

धुळे येथील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्ट येथे पोलिसांनी दोन संशयितांना चार गावठी पिस्तूल आणि काडतुसांसह पाठलाग करून पकडले. शिरपूर पोलिसांच्या या सिनेस्टाईल कारवाईचे कौतुक होत आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

धुळे : शिरपूर पोलिसांनी गुरूवारी २० जुलै रोजी ही कारवाई केली. बडवानी (मध्यप्रदेश) येथून दाढी वाढवलेले दोन व्यक्तीला गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून शिरपूरकडे जात आहेत, अशी खात्रीशीर माहिती सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार जयेश खलाणे यांनी तात्‍काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांना तात्काळ रवाना केले.

मुंबई-आग्रा महामार्गवर शिताफीने पकडले : बातमीप्रमाणे हाडाखेड शिवारात सीमा तपासणी नाका जवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील ब्लॅक हार्ट रेस्टॉरंटच्या समोर रोडवर, रात्री १० वाजेच्या सुमारास हे पायी येताना दिसले. सदर व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी हटकले असता त्यांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून शिताफीने पकडले. विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सदर व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले. त्यांनी त्यांचे नाव निलेश हनुमंत गायकवाड (वय ३० रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) मनीष संजय सावंत (वय २२ रा. सोमवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा) असे सांगितले. त्यांची अंगझडती व त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्तूल आढळले.



जप्त केलेला मुद्देमाल असा : १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतूसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी काॅन्स्टेबल इसरार फारूकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.


यांनी केली कारवाई : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांनी केली आहे.


शिरपूर पोलिसांना १० हजारांचे रिवॉर्ड : गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी कामगिरी केल्याबद्दल, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शिरपूर पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले. तसेच १० हजारांचे रोख बक्षीसही जाहीर केले.


याआधीही अनेक पिस्तूल, आरोपी पकडले : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर याआधीही गावठी पिस्तूल, काडतुससह अनेक संशयित पकडले गेले आहेत. गेल्या महिन्यात रोहिणी गावात पिस्तूलच्या सहायाने दहशत माजविणाऱ्याला शिरपूर पोलिसांनी पकडले होते. तसेच मालेगावच्या एका व्यक्तीला धुळे तालुक्यातील आर्वी येथून पिस्तूल काडतुससह ताब्यात घेतले होते.

हेही वाचा -

  1. Thane Crime : मशीनगनसह 20 पिस्तुल, 280 जिवंत काडतुसे जप्त; महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील कारवाई
  2. Pune Crime : अवैधरित्या गावठी पिस्तूलची विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 17 पिस्तूल, 13 जिवंत काडतुसे जप्त
  3. Nanded Crime: नांदेडमध्ये पुन्हा व्यापाऱ्यावर गोळीबार; आरोपी बाप अन् मुलगा पोलिसांना शरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.