चंद्रपूर Tiger Dead In Chandrapur : ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविदपूर बिटात रविवारी एका विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला. सापेपार मालमधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ आढळून आला. शिकारीच्या शोधात पाठलाग करत असताना तो विहिरीत पडला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. हा पट्टेदार वाघ हा नर असून अंदाजे वय अडीच वर्ष आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ. ममता वानखेडे यांनी वाघावर शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कशामुळं झाला वाघाचा मृत्यू? : सोमवारी सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बिटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे यांच्या शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर. जी. कोडापे घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेतलं. वाघाचा मृत्यू कशामुळं झाला याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालं नाही. या वाघाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मागील दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू :
१४ नोव्हेंबर- चिमूर वनपरिक्षेत्र- झुंजीत मृत्यू
१८ नोव्हेंबर-ताडोबा- नैसर्गिकरित्या मृत्यू
१० डिसेंबर- वरोरा वनपरिक्षेत्र- अपघात मृत्यू
१४ डिसेंबर- पळसगाव वनपरिक्षेत्र- नैसर्गिकरित्या मृत्यू
२१ डिसेंबर- सिंदेवाही वनपरिक्षेत्र- विद्युत करंटमुळं मृत्यू
२४ डिसेंबर- तळोधी वनपरिक्षेत्र- विहिरीत पडून मृत्यू
२५ डिसेंबर- सावली वनपरिक्षेत्र - मृत्यूचं कारण अस्पष्ट
तीन वाघांचा मृत्यू : याआधीही चंद्रपुरातअशीच एक घटना घडली होती. चिमूर तालुक्यातील मेटेपार गावात तीन वाघांचा मृतदेह (3 Tiger Dead ) आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा समावेश होता.
हेही वाचा -