ETV Bharat / state

Sarpanch Beaten: मुलींची छेड काढल्याच्या आरोपाखाली सरपंचाला चोप; सरपंच म्हणाले राजकीय षडयंत्र

author img

By

Published : Nov 29, 2022, 12:59 PM IST

Sarpanch Beaten
सरपंचाला चोप

बहिणीची छेड काढल्याच्या आरोपावरून (allegations of molesting girls) सरपंचाला मुलीच्या भावंडांनी भर चौकात चोप दिल्याची (Sarpanch beaten) घटना गोंडपिपरी शहरात घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. latest news from Chandrapur, Chandrapur Crime

चंद्रपूर : बहिणीची छेड काढल्याच्या आरोपावरून (allegations of molesting girls) सरपंचाला मुलीच्या भावंडांनी भर चौकात चोप दिल्याची (Sarpanch beaten) घटना गोंडपिपरी शहरात घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंच निलेश पुलगमकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. सरपंचांनी हे आरोप फेटाळले असून यात राजकीय षडयंत्र (Sarpanch said political conspiracy) असल्याचे सांगितले. या प्रकाराची तक्रार अद्याप पोलीस स्टेशनला दिलेली नाही.latest news from Chandrapur, Chandrapur Crime

सरपंचाची भर रस्त्यात पिटाई : हिवरा गावाचे सरपंच तथा भाजप पदाधिकारी निलेश पुलगमकर याने बसमध्ये मुलींची छेड काढली, असा आरोप आहे. ही बाब मुलींने भावडांना सांगितली. भावांचा संताप अनावर झाला होता. अशात आज सरपंच तहसील कार्यालय परिसरात असल्याची माहिती भावंडाना मिळाली. भावंडांनी गोंडपिपरी तहसील कार्यालय गाठले. सरपंच पुलगमकार यांची धुलाई केली. सरपंचाची धुलाई झाल्याची वार्ता गोंडपिपरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.

सरपंचाला सोडवायला कुणीच गेले नाही : विशेष म्हणजे धुलाई करताना अनेकांनी बघितले. मात्र सरपंचाला सोडवायला कुणीच गेले नाही. या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमात सरपंचाचे चांगलेच चिमटे काढले जात आहेत. दरम्यान माझ्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला. मी कोणत्याही मुलीची छेडखानी केली नाही. माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. याची कुठेही तक्रार नाही. असे पुलगमकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.