ETV Bharat / state

'झाडा'झडतीला तयार; चौकशी करण्यासाठी माजी वनमंत्री स्वतः देणार पत्र

author img

By

Published : Feb 19, 2020, 7:14 PM IST

Updated : Feb 19, 2020, 7:42 PM IST

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

33 कोटी वृक्ष लागवड ही वन विभागाकडून झाली नाही, असे म्हणत मी स्वतः या मिशनची चौकशी करण्याबाबत पत्र देणार असल्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर - तेहत्तीस कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशी प्रकरणावर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही वृक्ष लागवड वन विभागाकडून झालीच नाही. ही केवळ एक मिशन होते. यामध्ये वनविभागाने केवळ आश्वासन केले होते. जर कोणालाही याबाबात शंका असल्यास एक उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाशिधांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, राज्यातील शंकेखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा. ही चौकशी कराच अशा आशयाचे लेखी पत्र स्वतः देणार असल्याचे मुनगंटीवारांनी स्पष्ट केले आहे.

बोलताना माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुनंगटीवार म्हणाले, 33 कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय व पर्यावरण कार्य आहे. याच मिशनमुळे राज्यातील वनेतर क्षेत्रात जंगले वाढल्याची केंद्रीय वनसर्वेक्षण विभागात नोंद झाली आहे. तसेच लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे तर 32 विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'झाडा'झडती..! वनमंत्र्यांनी दिले मुनगंटीवारांच्या चौकशीचे आदेश

Last Updated :Feb 19, 2020, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.