ETV Bharat / state

Chandrapur Rain Update: चंद्रपूरमधील पावसाने 100 वर्षांचे मोडले रेकॉर्ड, जाणून घ्या पर्यावरण अभ्यासकांचे मत

author img

By

Published : Jul 20, 2023, 7:18 AM IST

Updated : Jul 20, 2023, 7:43 AM IST

चंद्रपुरमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. मंगळवारी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. या पावसाने नागरिकांची दाणादाण उडावून टाकली. 139 वर्षानंतर पहिल्यांदाच इतका पाऊस झाल्याचे पर्यावरण अभ्यासक सांगत आहेत.

Chandrapur Rain Update
चंद्रपूरमध्ये पाऊस

पर्यावरण अभ्यासकांची प्रतिक्रिया

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक घरांत पाणी शिरले आहे. 18 जुलै रोजी तब्बल 244 मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे तब्बल 100 वर्षानंतर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात 14 जुलै 1884 रोजी 254 मिमी पाऊस कोसळला होता. त्यानंतर असा पाऊस कोसळला आहे.



100 वर्षीतील सर्वांधीक पाऊस : चंद्रपुरमध्ये 18 जुलै 2023 रोजी 24 तासात 242 मिमी पडलेला पाऊस हा 100 वर्षीत जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस होता. यापूर्वी पावसाळ्यात चंद्रपूर शहरात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 24 तासांत सर्वाधिक पाऊस झाला होता. यापूर्वी हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीत यापेक्षा जास्त पाऊस 14 ऑगस्ट 1986 रोजी 329 मिमी तर 14 सप्टेंबर 1956 रोजी 249.4 मिमी पडला होता. परंतू जुलै महिन्यात मात्र इतका पाऊस कधीच पडला नव्हता, असे मत पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले. 18 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 24 तासांत 276 मिमी तर देशात कत्रा येथे 315 मिमी तर पकल दुल येथे 296 मिमी पडला. या अनुषंगाने चंद्रपूरमधील पाऊस महाराष्ट्रात दुसऱ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा होता, असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.

Chandrapur Rain Update
चंद्रपूरमधील सर्वाधिक पावसाच्या नोंदी
Chandrapur Rain Update
चंद्रपूरमधील सर्वाधिक पावसाच्या नोंदी

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता : रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. चंद्रपूरमध्ये मंगळवारी रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले होते. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आज महाराष्ट्रातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. शिवाय आज ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देत रायगड जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यातील सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे सांगितले आहे.



हेही वाचा :

  1. Maharashtra Rain Update : मुंबईसह कोकणात मुसळधार; यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  2. Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; रांगणा किल्ल्यावर पर्यटक अडकले तर राऊतवाडी धबधब्याने दाखवले रौद्ररूप
  3. Two Youths Drowned : नांदेड शहराजवळ असलेल्या असना नदी पात्रात दोन युवकांचा बुडून मृत्यू
Last Updated : Jul 20, 2023, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.