ETV Bharat / state

चंद्रपूर: 'बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने दारूतस्करांचा 'संघटित' व्यवसाय..'

author img

By

Published : Jun 17, 2020, 12:28 AM IST

adv-paromita-goswami-statement-on-illegal-liqueur-sell-in-chandrapur
'बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने दारूतस्करांचा 'संघटित' व्यवसाय..'

1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली. मात्र, पाच वर्षे पूर्ण होऊनही जिल्ह्यात दारूचा महापूर अव्याहतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्याच्या सीमांवर पोलीस तैनात असूनही ही दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.

चंद्रपूर- दारूतस्करांनी आता संघटीतरीत्या व्यवसाय सुरू केला आहे. याकरिता आता त्यांच्या गुप्त बैठका होत असून, त्यांनी आपसात क्षेत्र सुद्धा वाटून घेतले आहेत. एका परिसरात एक मोठा तस्कर आणि त्याखाली चिल्लर दारूविक्रेते काम करणार अशी ही सुनियोजित यंत्रणा आहे. याला जिल्ह्यातील मोठे नेते आणि बड्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे, असा धक्कादायक आरोप आम आदमी पार्टीच्या राज्य समिती सदस्य अ‌ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला आहे. याची तक्रार त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली. मात्र, पाच वर्षे पूर्ण होऊनही जिल्ह्यात दारूचा महापूर अव्याहतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्याच्या सीमांवर पोलीस तैनात असूनही ही दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. त्याही समोर जाऊन दारूतस्करांनी संघाटीतरित्या दारूविक्री करण्याची योजना आखली आले. अशा गुप्त बैठका घेऊन ते आपापसात क्षेत्र वाटप करुन घेत आहेत.

'बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने दारूतस्करांचा 'संघटित' व्यवसाय..'

भविष्यात यावर जीवघेणी स्पर्धा होऊ नये. व्यवसायात सामंजस्य राहावे ही त्या मागची भूमिका. एका परिसरात केवळ एकच मोठ्या दारुतस्करांचे वर्चस्व राहील त्याच्या हाताखाली चिल्लर दारूविक्रेते काम करणार. याबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमात होत आहेत. विशेष म्हणजे या संघटित दारूतस्करीवर जिल्ह्यातील बडे नेते आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. त्यांच्या आशीर्वादानेच हे दारुतस्करीचे रॅकेट काम करणार आहे.

भविष्यात दारुमाफिया तयार करण्याची ही प्रक्रिया आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही यंत्रणा तयार करण्यासाठी नेमका कोणाकोणाचा हात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करण्याची मागणी आपच्या अ‌ॅड. गोस्वामी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे.

कोण आहेत हे दारूतस्कर...
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूतस्कर आपला व्यवसाय सर्रासपणे करीत आहेत. यामध्ये चंद्रपूर येथील लालपेठ क्षेत्रात इलियास, वरोरा-भद्रावतीसाठी बंडू आंबटकर, ब्रम्हपुरी क्षेत्रात प्यारासिंग जुनी, मूल येथे मुन्नासिंग पटवा, चंद्रपूरमध्ये सिकंदरसिंग, घुग्गुस येथे दगड़ीसिंग यांचे नाव समोर येत आहे. तसेच चंद्रपूर शहरात लालपेठमध्ये R.B, बाबुपेठमध्ये P.J, महाकालीमध्ये E.S, रयतवारीमध्ये S.A अशा 'कोड वर्ड'ने हे दारूतस्कर काम करीत आहेत. हे दारूतस्कर कुणाच्या पाठबळाने अवैध व्यवसाय करीत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.