ETV Bharat / state

शेगाव-कालखेड रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा मिनीडोअर उलटला, 25 जखमी

author img

By

Published : Oct 20, 2020, 1:28 PM IST

बुलडाणा अपघात बातमी
शेगाव-कालखेड रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा मिनीडोअर उलटला, 25 जखमी

शेगाव-कालखेड मार्गावर परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या मिनीडोअरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी (20 ऑक्टोबर) सकाळी घडली आहे. या अपघातात 25 मजूर जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सर्वांना अकोल्यात हलवण्यात आले आहे.

बुलडाणा : शेगाव-कालखेड मार्गावर परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या मिनीडोअरचा भीषण अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या दुर्घटनेत 25 मजूर जखमी झाले. तर दोघे अत्यवस्थ आहेत. सर्व जखमींना अकोला येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांच्या बेजबाबदार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - एक हजार हेक्टर जंगलात आरटी-1 वाघाला शोधण्याचे आव्हान; वनविभागाच्या शोध मोहीमेचा 'ग्राऊंड झिरो रिपोर्ट'

मध्यप्रदेशातून जवळपास 50 मजूर शेगाव तालुक्यातील मानेगाव येथे आले होते. आज सकाळी कालखेड रस्त्यावरील एका शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी मिनीडोअरने जात असताना शहरानजीक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिनीडोअर उलटला. यामध्ये 25 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्नालयात हलविण्यात आले. यातील दोन मजुरांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही वाचा - पूजा, उत्सवांसाठी मध्य रेल्वे चालवणार 48 विशेष ट्रेन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.