ETV Bharat / state

बुलडाण्याच्या नांदुरा-वडनेर मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 24, 2021, 10:15 PM IST

tragic-accident-on-nandura-wadner-road-three-death-in-buldana
बुलडाण्याच्या नांदुरा-वडनेर मार्गावर भीषण अपघात; तीघांचा मृत्यू

भरधाव कंटेनरने काळी पिवळी गाडीला धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी येथे भीषण अपघातात घडला. या अपघातात तिघांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले आहे.

बुलडाणा - आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने काळी पिवळी गाडीला धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी येथे भीषण अपघातात घडला. या अपघातात पती-पत्नीसह तिघे जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहे.

कंटेनरने काळी-पिवळीला दिली धडक -

काळी पिंवळी गाडी नांदुऱ्याकडून मलकापूरकडे प्रवासी घेवून जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने काळी पिवळी गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात सुनील सुभाष तायडे व अर्चना सुनील तायडे रा.वडनेर हे दोघे तसेच पती-पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी रा.वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर आशा पुंडलीक जंगले रा.काटी, जय अनंतराव जंगले रा. काटी, रामचंद नथ्थू सातव रा.वडनेर, पुष्पा गजानन इंगळे रा.वडनेर, श्रेया सुनील तायडे, तनिष्का रमेश होनाडे, रियांश सुनील तायडे, कमल दिनकर पांडे, बेबाबाई राजाराम सातव दोन्ही रा.वडनेर असे ९ प्रवासी जखमी झाले आहे.

आमेसाई फाऊंडेशनच्यावतीने मदतकार्य -

या घटनेची माहिती मिळताच आमेसाई फाऊंडेशनचे कार्यकर्ते विलास निंबोळक, पत्रकार प्रविण डवंगे, आनंद वावगे आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरीता खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.

चालकाने कंटेनर घेवून काढला होता पळ -

दरम्यान, अपघातस्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेवून पळ काढला होता. त्याला नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले. याप्रकरणी कंटेनर चालक जिवन नलबतसिंग मालवी (३२) रा.निपानी खुर्द जि.साजापूर मध्यप्रदेश याला नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अभ्यास केंद्राची निर्मिती लवकरच - उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.