ETV Bharat / state

बुलडाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर यांना गुणवत्तापूर्ण पोलीस पदक पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Jan 26, 2021, 12:02 AM IST

Rajesh Nagrurkar
पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर

बुलडाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गुणवत्तापूर्ण पोलीस पदक पुरस्कार २५ जानेवारी रोजी जाहीर केला आहे.

बुलडाणा - पोलीस विभागात भरती झाल्यापासून आजपर्यंत पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बुलडाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गुणवत्तापूर्ण पोलीस पदक पुरस्कार २५ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. त्यामुळे पोलीस विभागात उत्साहाचे वातावरण आहे. हे पदक नगरूकर यांना शासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

राखीव पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर यांची कामगिरी

राखीव पोलीस उपनिरीक्षक राजेश नगरूरकर हे १९८४ मध्ये फुटबॉल खेडाळू असल्याने राखीव पोलीस विभागात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. त्यांनी तब्बल २० वर्ष पोलीस खात्यासाठी फुटबॉल खेळले आहेत. १९९० मध्ये त्यांनी ड्रीम इंस्पेक्टर कोर्स करून राखीव पोलीस उपनिरीक्षक बनले व त्यानंतर ते नवीन रिक्रूड तयार केले. ही उत्कृष्ट कामगिरी करत असताना त्यांना आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त पोलीस रिवार्ड मिळालेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या ३७ वर्षाच्या पोलीस सेवेत आजपर्यत एकही सुट्टी घेतली नाही. त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण पोलीस पदक पुरस्काराची घोषणा सोमवारी शासनाच्या एका परिपत्रकाने जाहीर करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.