ETV Bharat / state

अकोला-खामगाव महामार्गावर एसटी-ट्रकचा अपघात; 26 जखमी

author img

By

Published : Jan 14, 2020, 11:31 AM IST

Updated : Jan 14, 2020, 2:20 PM IST

akola-khamgaon highway accidents
अकोला-खामगाव महामार्गावर एसटी-ट्रकचा अपघात; 26 जखमी

एसटीने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत एसटीतील 26 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले.

बुलडाणा - एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत एसटीतील 26 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाची बस अकोल्यावरून परतताना संबंधित अपघात घडला.

अकोला-खामगाव महामार्गावर एसटी-ट्रकचा अपघात; 26 जखमी

आज (14 जानेवारीला) सकाळी अकोल्यावरून सिंदखेडा-धुळे ही एसटी खामगावच्या दिशेने येत होती. या बसमध्ये 55 ते 60 प्रवासी होते. प्रवासादरम्यान खामगाव जवळील टेंभुर्णा फाट्यावर इंडिका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रकला एसटीने जोरदार धडक दिली.

एसटी बसचा समोरील भाग पूर्णपणे तुटला असून 26 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.

Intro:Body:बुलडाणा:- अकोला वरून परत येत असतांना एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या धडकेत एसटी बसमधील 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.सर्व जखमींना खांमगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारसाठी भरती करण्यात आले आहे..

आज मंगळवारी 14 जानेवारीच्या सकाळच्या दरम्यान अकोल्याच्या वरून अकोला सिंदखेडा-धुळे ही एसटी बस खांमगावकडे परत येत होती बसमध्ये 55 ते 60 प्रवासी होते दरम्यान परत येत असतांना खांमगाव जवळील टेंभुर्णा फाट्याजवळ इंडिका वाहनाला वाजविण्याच्या प्रयत्नात समोर येणाऱ्या ट्रक वर एसटी बसने जोरदार धडक दिल्याची माहिती मिळालीय यामध्ये एसटी बसचे समोरील भाग पूर्णपणे तुटले असून 26 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated :Jan 14, 2020, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.