ETV Bharat / state

'जिजाऊ स्मारकाच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात केवळ निराशा मिळाली'

author img

By

Published : Jan 12, 2020, 7:33 PM IST

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अनेक वर्षांपासून मी सिंदखेड राजा इथे येते. यंदा स्मारक पूर्ण झाले असेल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही इथे अनेक कामे अपूर्ण आहेत. ही बाब अतिशय निराशाजनक आहे" आगामी काळात जिजाऊ स्मारकाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

बुलडाणा - राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे नियोजित स्मारकाच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात राज्य आणि केंद्र सरकारकडून केवळ निराशा मिळाल्याची खंत, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी आल्या असता त्या माध्यमांशी बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे

हेही वाचा - बीडमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी; विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अनेक वर्षांपासून मी सिंदखेड राजा इथे येते. यंदा स्मारक पूर्ण झाले असेल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही येथे अनेक कामे अपूर्ण आहेत. ही बाब अतिशय निराशाजनक आहे" आगामी काळात जिजाऊ स्मारकाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:Body:बुलडाणा:- अनेक वर्षापासून मी सिंदखेड राजा इथं येते. यंदा मात्र, जिजाऊंच्या स्मारका संदर्भात वेगळ्या भावना आहेत मागील पाच वर्षात खूप अपेक्षा होत्या राज्य आणि केंद्र सरकार कडून त्यांच्या कडून केवळ नैराश्य मिळालंय खंत व्यक्त करत मागील राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत राहलेली कामे आता तातडीने पूर्ण होतील अशी सिंदखेडराजा विकास आराखड्या संदर्भात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे म्हणाल्या. ते बुलडाण्याच्या सिंदखेडराजा याठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवच्या निमित्ताने माँ जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते आज रविवारी आल्या होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष नाजेर काजी सह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.......

बाईट:-सुप्रिया सुळे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.