ETV Bharat / state

बुलडाणा-धाड मार्गावरील ढालसावंगीच्या जंगलात आग

author img

By

Published : Mar 4, 2021, 6:57 AM IST

Dhalsawangi forest news
ढालसावंगी जंगल आग

बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी गावातील जंगलाला आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेकडो हेक्टर जंगल जळाले असून वन विभाग आग कशी लागली याचा तपास करत आहे.

बुलडाणा - ढालसावंगी गावाजवळील बुलडाणा-धाड रोडवरील जंगलात असलेल्या आंब्याच्या खोऱ्यात बुधवारी दुपारी आग लागली. या आगीमध्ये शेकडो हेक्टर जंगल जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही आग विझवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचारी आटोकाट प्रयत्न केले.

ढालसावंगीच्या जंगलात आग लागली

आगीचे जंगलाचे मोठे नुकसान -

बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी गावाजवळ जंगल आहे. या जंगलाचा एक भाग आंब्याचा खोरा नावाने प्रसिद्ध आहे. या आंब्याच्या खोऱ्यात बुधवारी दुपारी अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. बुलडाणा-धाड रोडवरून जंगलात लागलेल्या आगीचे लोट दिसत असल्याने वनविभागाला आगीची माहिती मिळाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. ही आग कशी लागली याबाबत वनविभागाकडून तपास होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.