ETV Bharat / state

Pre Fabricated Field Hospital: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 'प्री फॅब्रिकेटेड फिल्ड हॉस्पिटल' ची निर्मिती युद्ध पातळीवर

author img

By

Published : Dec 31, 2022, 5:12 PM IST

Pre Fabricated Field Hospital
प्री फॅब्रिकेटेड फिल्ड हॉस्पिटल

Pre Fabricated Field Hospital: देशातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढत ( district on war ) असल्याने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Corona Update) जिल्हा सध्या कोरोनामुक्त असल्याने दिलासादायक स्थिती आहे.

बुलढाणा: कोरोनाचे आगमन झालं तेव्हा, चीनमध्ये झटपट उभे राहणारे हॉस्पिटल उभे राहिले. (Coronavirus disease) याच रुग्णालयावर चीनने मदार ठेवत कोरोनावर मात केली आहे. (Pre Fabricated Field Hospital) अगदी त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यात ही दोन ठिकाणी अशीच हॉस्पीटल उभी राहत आहेत. (Corona Update) चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे आगमन पाहता आपल्या देशात ही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (Coronavirus Update) पूर्वतयाीसाठी बुलढाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रि फॅब्रिकेटेड फिल्ड हॉस्पिटलची निर्मिती केली जात आहे.

वैद्यकीय अधिकारी यासाठी सेवा देणार: हे रुग्णालय बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयाला लागूनच 100 बेडचे आयसीयू युनिट असलेले हॉस्पीटल उभे राहणार असून खामगावला सुद्धा 50 बेडचे आयसीयू युनिटचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या हॉस्पिटलमध्य सर्व सुविधा असणार असून १५ वैद्यकीय अधिकारी (15 Medical Officers) यासाठी सेवा देणार आहेत. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत हे हॉस्पिटल आरोग्य यंत्रणेला सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा झाली पुन्हा सतर्क: देशातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा सध्या कोरोनामुक्त असल्याने दिलासादायक स्थिती आहे. असे असले तरी संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी निर्देशांचे पालन करून आवश्यक ती तयारी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आली.

निर्देशानुसार आवश्यक तयारी पूर्ण: जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तरी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सूचना प्राप्त झाल्या आहेत. निर्देशांनुसार आवश्यक ती तयारी करण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.