ETV Bharat / state

'केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट देण्याचा निर्णय'

author img

By

Published : May 16, 2021, 7:57 PM IST

Updated : May 16, 2021, 8:25 PM IST

उद्घाटन करताना
उद्घाटन करताना

केंद्र सरकारने कोरोना काळात रेमडेसिवीर, ऑक्सिजनची सर्वाधिक मदत महाराष्ट्राला केली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुलडाण्यात म्हणाले.

बुलडाणा - भारतातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट देण्याचा निर्णय केला आहे. केंद्र सरकार ते आपल्या सीएसआर निधीतून देणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पीएसए ऑक्सिजन प्लांट तयार झाल्यानंतर आता जी ऑक्सिजनची कमतरता आहे. ती दूर होईल, असे मत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे व्यक्त केले.

बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढत होत असल्यामुळे चिखली येथे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी गरीब रुग्णांसाठी आधार कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याचे उद्घाटन आज (16 मे) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री माजी ऊर्जामंत्री बावनकुळे, माजी मंत्री आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी विजयराज शिंदे उपस्थित होते.

आधार कोविड केअर सेंटरमध्ये मोफत उपचार अन् जेवण

चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले पाटील यांच्या संकल्पनेतून चिखलीत आधार कोविड केअर सेंटर उभारले आहे. या कोविड केअरमध्ये एकूण 70 बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील 20 बेड ऑक्सिजन बेड आहेत. स्त्री-पुरुष रुग्णांसाठी वेगळे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये दोन वेळचे जेवण व उपचार मोफत देण्यात येणार आहे.

पंतप्रधानाच्या माध्यमातून सर्वाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेत लहान मुले बाधीत झाली नव्हती. ती कदाचित तिसऱ्या लाटेमध्ये बाधीत होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. आपल्याला केंद्र सरकारच्या वतीने भारतातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट देण्याचा निर्णय केला आहे. पंतप्रधानांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले. सर्वात जास्त ऑक्सिजन व व्हेंटिलेटरही महाराष्ट्राला प्राप्त झाले. आता मोठ्या प्रमाणत हे जे ऑक्सिजनेटर आहे. ते देखील केंद्रसरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिल्या जात आहे. कोरोनाच्या या लढाईमध्ये भेदभाव न करता आपल्या सर्वांना कोरोना रुग्णांच्या पाठीशी उभे राहून त्यांना या अडचणीतून कसा बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - खामगावात पोलिसांचे पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन, २ आरोपींकडून १ देशी पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Last Updated :May 16, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.