ETV Bharat / state

Bhendwal Bhavishyavani 2023: भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर ; 'अशी' आहे या वर्षीची भेंडवळची भविष्यवाणी

author img

By

Published : Apr 23, 2023, 9:32 AM IST

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते आज जाहीर झाली आहेत. सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. आपण या वर्षीची भविष्यवाणी काय आहे, ते सविस्तर जाणून घेवू या.

Bhendwal Bhavishyavani 2023
भेंडवळ भविष्यवाणी 2023

अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे- सारंगधर महाराज,भेंडवळ

बुलढाणा : यंदा पावसाच्या परिस्थितीमध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असणार आहे. जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असणार आहे. अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल, मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पीकं सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगले असले तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार आहे, असे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आले आहे.

देशाचा राजा तनावात राहील : राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेले आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार, म्हणजे पंतप्रधान कायम राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार, असे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे. मात्र देशात रोगराईचे प्रमाण वाढलेले राहील. तसेच परकीयांचे त्रास जास्त असल्याने राजाला ताणाव राहील. व महाराष्ट्राचा राजा म्हणजे मुख्यमंत्री यांच्याविषयी बोलणे टाळले, कारण ही भविष्यवाणी देशाची असते, राज्याची नसते असे उत्तर महाराज यांनी दिले. भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते दरवर्षी जाहीर केले जातात.



घट मांडणीची व भविष्याची पद्धत : शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या 'घट मांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, तर सूर्योदयानंतर याची भविष्यवाणी जाहीर केल्या जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते.



हेही वाचा : Bhendwal Ghatmandani : भेंडवळ येथील घाटमांडणीचा काय असेल अंदाज? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.