विधवा वहिणीला सौभाग्याचं कुंकू लावत दीरानं स्वीकारले अडीच वर्षाच्या मुलाचं पितृत्व

author img

By

Published : May 13, 2022, 3:38 PM IST

दीर वहिणीचे लग्न

लग्नाच्या रेशीमगाठी बांधत विवाहबंधनात विधवा वहिनी आणि दीर अडकले. एका दिराने आपल्या विधवा वहिनी विशाखाच्या कपाळावर कुंकु घालुन सौभाग्यचं लेणं मंगळसुत्र गळ्यात बांधलं. तर दुसरीकडे अडीच वर्षाच्या पुतण्याचे पितृत्व स्वीकारत त्याच्या उज्वल भविष्याची नांदी स्वीकारली.

भंडारा - सात महिन्याअगोदर अपघातात भावाचा मृत्यू झाला. विधवा झालेल्या वाहिनीचे आणि अडीच वर्षाच्या पुतण्याचे भविष्य सुखरूप व्हावे म्हणून दिराने वहिणीशी लग्न करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. तुमसर तालुक्यातील खापा या छोट्याशा गावात हे आदर्श कार्य पार पडले आहे.

सौभाग्याचं कुंकू लावत दीरानं स्वीकारले अडीच वर्षाच्या मुलाचं पितृत्व

अपघातात पतीचा मृत्यू - भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. पती-पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाक मानले जातात. त्यात एक चाक तूटले कि जीवन असह्य होऊन जाते. एकाकी जीवन त्रासदायक होऊन जाते. खापा येथे तीन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या योगेश बुरडे व विशाखा यांचा वैवाहिक संसार सुरळीत चालला होता. योगेश व विशाखा यांना एक पुत्ररत्न देखील प्राप्त झाले. दरम्यान एसटी महामंडळ नोकरीवर रुजू होऊ पाहणाऱ्या खापा येथील योगेश किसना बुरडे या विवाहित तरुणाचा 22 सप्टेंबर 2021 रोजी दहेगाव येथे अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. योगेशच्या मृत्युच्या आघाता संपुर्ण बुरडे कुटूबियांवर झाला. त्याच्या मृत्युपश्चात पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा, आई-वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार होता. पती योगेशच्या अपघाती निधनामुळे पत्नी विशाखा हेलावून गेली होती. आपले कसे होणार, अडीच वर्षाच्या मुलाचे संगोपन कसे करणार हा प्रश्न तिला सतत भेडसावत होता. पतीच्या निधनाच्या विरहात ती समाजात विधवा म्हणून पोटच्या अडीच वर्षाच्या मुलांसोबत आपल्या सासरीच सासु, सासरे, दिर यांच्यासोबत एकत्र वावरत होती.

वडीलांनी ठेवला प्रस्ताव - आपली सुन समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती आणि घरात सुनकन्या म्हणून वावरावी तसेच तिच्या कपाळावरचं कुंकु नेहमी हसत खेळत असावं आणि निरागस अडीच वर्षाच्या नातवाला कायमची पितृछाया मिळावी असा दृष्टिकोन मृतक योगेशचे वडील किसना बुरडे यांनी ठेवला. त्यानुसार पान टपरी आणि चहा पानाचा लघु व्यवसाय करणारा आपला लहान मुलगा व विधवा झालेली सुन विशाखा या दोघांपुढे तसा प्रस्ताव ठेवला. प्रस्तावाने दीर विजय विचारात पडला. मात्र अडीच वर्षाच्या पुतण्याच्या भविष्याचा विचार करत त्यांनी सहमती दिली. विधवा सुन विशाखा हिनेही बराच विचार करून शेवटी लग्नाला दुजोरा दिला.

समाजात नवा आदर्श - दोघांचीही संमती झाल्यानंतर विशाखाच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत भारतीय संस्कृती व रूढी परंपरेनुसार मोहाडी येथील चौंडेश्वरी माता मंदिरात 10 मे रोजी नोंदणीकृत विवाह करण्यात आला. लग्नाच्या रेशीमगाठी बांधत विवाहबंधनात विधवा वहिनी आणि दीर अडकले. एका दिराने आपल्या विधवा वहिनी विशाखाच्या कपाळावर कुंकु घालुन सौभाग्यचं लेणं मंगळसुत्र गळ्यात बांधलं. तर दुसरीकडे अडीच वर्षाच्या पुतण्याचे पितृत्व स्वीकारत त्याच्या उज्वल भविष्याची नांदी स्वीकारली. आजघडीला बदलत्या काळाच्या ओघात दीर विजय व विधवा वहिनी विशाखा या नवदाम्पत्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला असून समाजाने हे आदर्श अंगिकारावे हीच अपेक्षा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.