ETV Bharat / state

Farm Laborers Death: कासवाचा मोह पडला महागात; विहिरीत उतरलेल्या दोन शेतमजुरांचा मृत्यू, महिलांच्या समय सूचकतेमुळे वाचले एकाचे प्राण

author img

By

Published : Jul 26, 2023, 2:14 PM IST

Farm Laborers Death
शेतमजुरांचा विहिरीत पडून मृत्यू

कासव काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडलेली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या इतर शेतमजूर महिलांच्या धाडसामुळे आणि समय सूचकतेमुळे एका मजुराचे प्राण मात्र वाचले आहे. मंगेश जयगोपाल गोंधुळे (वय ४०) आणि दयाराम सोनीराम भोंडे (वय ३८ वर्ष दोघेही राहणार मेंढा-भुगाव ता. लाखनी) असे मृतकाचे नाव आहे. सुधीर मोरेश्वर हजारे (वय ३५) असे प्राण वाचलेल्या युवकाचे नाव आहे.

शेतमजुरांचा विहिरीत पडून मृत्यू

भंडारा : मागील आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेती कामाला चांगलाच वेग आलेला आहे. मात्र अचानक शेती काम सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मिळेल त्या गावातून मजूर आणावे लागतात. लाखनी तालुक्यातील गढपेंढरी येथील अशोक गायधने या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील रोवणीसाठी लाखनी तालुक्यातील भुगाव मेंढा येथील जवळपास पंधरा स्त्री-पुरुष हुंडा (गुता) पद्धतीने रोवणीसाठी आणले.


विहीरीत विषारी गॅस : बुधवारी सकाळी शेतात रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. महिला हे रोवणीचे काम करत होत्या, तर पुरुष हे महिलांपर्यंत रोप (पेंढ्या) नेऊन देण्याचे काम करत होते. हे सर्व सुरळीत सुरू असतांना पुरुष जवळ असलेल्या पडक्या विहारीजवळ गेले. विहिरीत त्यांना एक मोठा कासव कासव दिसला. कासव काढण्याचा मोह या तिघांना आवरता आला नाही. कासव काढण्यासाठी प्रथम एक व्यक्ती खाली उतरला. मात्र, विहीरीचा वापर बंद असल्यामुळे तिथे विषारी गॅस तयार झाला होता. त्यामुळे खाली गेलेला व्यक्ती पाण्यात गटांगळ्या खात होता, हे बघून त्याला वाचविण्यासाठी वर असलेले दोघेही विहीरीत उतरले. मात्र, खाली उतरताच त्यांचा देखील श्वास गुदमरू लागल्याने त्यांनी 'वाचवा, वाचवा' म्हणून ओरडायला सुरुवात केली. रोवणी करणाऱ्या महिला मजुरांना त्यांचा आवाज येताच त्या विहिरीकडे धावल्या. तेव्हा त्यांना विहीरीत पुरुषांचा श्वास गुदमरल्याने ते कासावीस होताना दिसले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी ओरडावरून सुरू केली. मात्र, जवळपास इतर पुरुष नसल्याने कोणीही मदतीला आले नाही.

महिलांनी दाखवली समय सूचकता : मदत मिळत नसल्याचे समजताच उपस्थित महिलांनी लगेच समय सूचकता दाखवली. धाडस करीत स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून त्याचा दोर बनविला, तो विहिरीत सोडला. साडीच्या साहाय्याने बनविलेल्या दोराला पकडून सुधीर मोरेश्वर हजारे हा वर आला. मात्र, उर्वरित दोन मजूर मंगेश जय गोपाल गोंधुळे आणि दयाराम सोनीराम भोंडे या दोघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना वर काढण्यात महिलांना अपयश आले. या घटनेची माहिती संपूर्ण परिसरात पसरल्यानंतर गावकरी तिथे जमा झाले. पोलिसांना घटनेविषयी माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्हीही मृतदेह बाहेर काढले. त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. केवळ एका कासवाच्या मोहापायी दोन शेतमजुरांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Bullocks Died: उत्रे येथे गोठ्याला आग तर पुराच्या पाण्यात बुडून बैल जोडीचा दुर्दैवी मृत्यू
  2. Junagadh Building Collapsed : जुनागडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
  3. Nanded Rain Update: मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा, ६३ घरांची पडझड, एकाचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.