सेल्फी बेतला जीवावर, गोसे धरणातून सोडलेल्या पाण्यात बुडाले सख्खे भाऊ

author img

By

Published : Aug 16, 2021, 7:06 AM IST

Updated : Aug 16, 2021, 9:56 AM IST

सेल्फी बेतला जीवावर

रविवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने बरेच नागरिक गोसे धरणावर पर्यटनासाठी आले होते. त्याप्रमाणे उमरेड तालुक्यातील विनोद आणि मंगेश हे दोन्ही भाऊ मित्रा सोबत पर्यटनासाठी गोसेखुर्द धरणावर आले होते. त्यावेळी धरणाच्या पॉवर हाऊसजवळ सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे विनोद पाण्याजवळ उतरला. मात्र, त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो वैनगंगा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला.

भंडारा/नागपूर - पाण्याच्या प्रवाहात उतरून सेल्फी काढणे दोन भावांच्या जीवावर बेतल्याची घटना गोसे धरणावर घडली आहे. धरणाच्या पॉवर हाऊसच्या पाण्याजवळ सेल्फी काढतांना तोल गेल्याने दोन्ही भावडांचा बुडून मृत्यू झाला आहे. विनोद मधुकर जुनघरे (वय 35) आणि मंगेश मधुकर जुनघरे (वय 37) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या रा. रेवतकर ले आऊट येथील रहिवासी आहेत. या दोन्ही भावांचा धरणाच्या पाण्यात शोध घेतला जात आहे. याप्रकरणी रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत पवनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी बचाव पथकाच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेत आहेत.


स्वातंत्र्य दिनाच्या सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी धरणावर पर्यटन-

रविवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने बरेच नागरिक गोसे धरणावर पर्यटनासाठी आले होते. त्याप्रमाणे उमरेड तालुक्यातील विनोद आणि मंगेश हे दोन्ही भाऊ मित्रा सोबत पर्यटनासाठी गोसेखुर्द धरणावर आले होते. त्यावेळी धरणाच्या पॉवर हाऊसजवळ सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे विनोद पाण्याजवळ उतरला. मात्र, त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो वैनगंगा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. ही घटना पाहताच मोठा भाऊ मंगेश याने विनोदला वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी मारली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तोदेखील पाण्यात वाहून गेला.

सेल्फी बेतला जीवावर,

या घनटेची माहिती मिळतचा पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नदीपात्रात या दोन्ही भावंडांचा शोध सुरू केला. मात्र पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने या दोन्ही भावंडांचा रात्री 10 वाजेपर्यंत शोध लागला नाही. एकाच घरातील दोन तरुण भावंडांच्या सेल्फीच्या मोहात जीवावर बेतलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली, तसेच पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated :Aug 16, 2021, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.