ETV Bharat / state

भंडारा; विषबाधेमुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू; ४० ते ५० जणांना विषबाधा झाल्याची शक्यता

author img

By

Published : Mar 16, 2021, 1:56 PM IST

Updated : Mar 16, 2021, 5:43 PM IST

विषबाधेमुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू
विषबाधेमुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू

ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि हळूहळू ही बाब समोर आली की गावातील बरेच लोकांना सध्या उलटी आणि हागणीचा त्रास सुरू झाला आहे. अशा लोकांवर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमक्या किती लोकांना याचा त्रास होतो आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही.

भंडारा- जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात विषबाधेमुळे १२ वर्षीय मुलीचा मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर गावातील गावात ३० ते ४० लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे असे त्या मृत मुलीचे नाव असून रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्याने उलट्या आणि हगवण सुरू झाली होती. त्यामुळेच मृत्यू झाल्याचे ज्ञानेश्वरीच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. विषबाधा झालेल्या लोकांना उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

विषबाधेमुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू;

आठवडी बाजारात खाल्ले चायनीज आणि पाणीपूरी

भेंडाळा या गावात रविवारी आठवडी बाजार होता. आठवडी बाजार मध्ये गुपचूप आणि हे चायनीजचे ठेले लागले होते. ज्या लोकांनी पाणीपूरी आणि नूडल्स खाल्ले अशा सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनीसुद्धा हे नूडस खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या मुलांनी सोमवारपासून काहीही खाल्ले नव्हते. त्यातच मंगळवारी ज्ञानेश्वरीची प्रकृती जास्त झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.

आरोग्य यंत्रणा सतर्क

ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि हळूहळू ही बाब समोर आली की गावातील बरेच लोकांना सध्या उलटी आणि हागणीचा त्रास सुरू झाला आहे. अशा लोकांवर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमक्या किती लोकांना याचा त्रास होतो आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत गावात पोहोचली आहे. प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करून माहिती गोळा करत आहेत. तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे त्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे.

विषबाधा नेमकी कशाने झाली याचा शोध

गावातील लोकांना नेमकी विषबाधा कशामुळे झाली. नूडल्स किंवा पाणीपुरीमुळे की अजून इतर कारणामुळे, याचा शोध सध्या आरोग्य यंत्रणा घेत आहे.

हेही वाचा- अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओ सापडण्यापासून वाझेंच्या अटकेपर्यंत, असा राहिला घटनाक्रम

Last Updated :Mar 16, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.