ETV Bharat / state

Car Accident Bhandara: देवदर्शनावरून येताना काळाचा घाला, रामटेक रोडवर अपघातात तिघांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 10, 2023, 4:59 PM IST

Car Accident Bhandara
कारचा अपघात

देवदर्शन आणि पर्यटनाला गेलेल्या भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील वाहनाचा नागपूर जिल्ह्याच्या अरोली या गावाजवळ अपघात झाला. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला असून 6 लोक गंभीर जखमी झालेले आहेत.

भंडारा : सर्व जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. परसराम लहानु भेंडारकर (70 वर्षे), हिमांशू राजेश भेंडारकर (8 महिने) आणि भार्गवी चंद्रहास बोंद्रे (8 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

कंटेनरमुळे अपघात : साकोली तालुक्यातील सोनकापळस गावातील राजेश परसराम भेंडाळकर (वय 34 वर्षे) हे त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह स्वतःच्या मालकीची गाडी असलेल्या (एम-एच-36-एच- 8403) गाडीने भंडारावरून नागपूर जिल्ह्यातील रामटेकला गेले. देवदर्शन आणि पर्यटन करून परत येताना रामटेक तालुक्यातील रामटेक-भंडारा रोडवरील अरोली या गावाजवळ पिवळ्या रंगाचा कंटेनर (एम-एच- 40- सी डी-9403) हा रोडच्या कडेला उभा होता. पार्किंग नसलेल्या जागेत कंटेनर उभे करून ट्रक पार्किंगमध्ये आहे, असे कुठलेही चिन्ह, सूचना या ट्रकच्या शेजारी नव्हत्या. त्यामुळे ट्रक सुरू आहे की बंद याचा नेमका अंदाज गाडी चालक राजेश भांडारकर याला आला नाही. गाडी कंटेनरच्या अगदी जवळ आल्यानंतर त्याला हे लक्षात आल्यावर त्यांनी गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्याने गाडीचा डावा भाग सरळ कंटेनरवर आदळला.

गावकरी आले धावून : अपघातानंतर गावातील नागरिकांनी सर्व जखमींना गाडीच्या बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी सर्वप्रथम रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच परसराम लहानु भांडारकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर मध्ये उपचार सुरू असताना 8 महिन्यांच्या हिमांशू राजेश भांडारकर याचा मृत्यू झाला तर भार्गवी चंद्रहास बोंद्रे हीचासुद्धा मृत्यू झाला.

या जखमींवर उपचार सुरू: गाडीमध्ये असलेल्या 9 लोकांपैकी आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झालेला असून 6 लोक जखमी आहेत. जखमींमध्ये गाडी चालक राजेश परसराम भेंडारकर (34 वर्षे), दुर्गा राजेश भेंडारकर (32 वर्षे), मेगा चंद्रहास बोंद्रे (वय 31 वर्षे), सीताबाई परसराम भेंडारकर (वय 64 वर्षे), उन्नती राजेश भेंडारकर (वय 5 वर्षे), भाव्या चंद्रहास बोंद्रे (वय 8 वर्षे) सर्व राहणार सोनकापळस तालुका साकोली. या सर्व जखमी रुग्णांवर नागपूर येथे सध्या उपचार सुरू आहेत.

पुरेशी काळजी न घेतल्याने अपघात: चुकीच्या जागी पार्किंग करून सदर ट्रक चालकाने पार्किंगचे कोणतेही इंडिकेटर, त्रिकोणी चिन्ह, सूचना व चिन्ह न लावता पार्किंग केल्यामुळे हा अपघात झाला. यामुळे दोषी ट्रक मालकाविरुद्ध कलम 283, 337, 338, 304 भादंवि सह कलम 122, 177 मोपाका अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.