ETV Bharat / state

दीड वर्षापासून कामाचा मोबदला न मिळाल्याने हमाल आर्थिक अडचणीत

author img

By

Published : Mar 16, 2021, 4:40 PM IST

agitator
आंदोलक

मागील दीड वर्षांपासून धान खरेदी केंद्रावर काम करणाऱ्या हमालांना (माथाडी कामगार) हमालीचे लाखो रूपये तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेने न दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर मोठी दीघोरी समोर आला आहे.

भंडारा - मागील दीड वर्षांपासून धान खरेदी केंद्रावर काम करणाऱ्या हमालांना (माथाडी कामगार) हमालीचे लाखो रूपये तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेने न दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर मोठी दीघोरी येथे समोर आला आहे. हमालांकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, मोबदल्यात त्यांना अद्यापही हमालीचे पैसे देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपाषमारीची वेळ आली आहे. परिणामी तालुका खरेदी विक्री संस्थेच्याविरोधात हमालांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

दीड वर्षात पैसेच दिले नाही

2019-20 वर्षात तालुका खरेदी विक्री संस्थेने हमालांकडून धान खरेदी केंद्रावर हमालीचे काम करवून घेण्यात आले. मात्र, हमाली देण्यात आली नाही. तर 2020-21 या वर्षातील धान खरेदी काम पूर्ण झाले असतानाही यावर्षीचीही हमाली देण्यात आली नाही. आधीच कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे हमाल संकटात असताना दीड वर्षापासून रब्बी आणि खरिपाचे हमालीचे पैसे देण्यात न आल्याने त्यांनी घरप्रपंच कसा चालवायचा, असा सवाल त्यांचेसमोर उभा ठाकला आहे. या संस्थेत जवळपास 30 हमाल कार्यरत आहेत. त्यामुळे या मजुरांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

संस्था मालक बोलण्यास तयार नाही

सध्या गोदामे हाऊसफुल्ल झाल्याचे कारण समोर करत गोदामांना कुलूप लावून हमालांना बेरोजगार केले आहे. याविषयी धान खरेदी केंद्र संस्थाचालकांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

हमलांनी सुरू केले आंदोलन

आपल्या हक्काच्या पैशांची वारंवार मागणी करूनही आधारभूत धान खरेदी केंद्राचे संस्थाचालक नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतापलेल्या हमालांनी आक्रमक भूमिका घेत हमालीची मागणी करत आहेत. या संस्थाचालकांनी हमालांच्या पैशाची हेराफेरी करून 50 हजार रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप हमाल करीत आहेत. आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. लवकरात लवकर आमच्या हक्काचे पैसे द्यावे ही मागणीही आंदोलन करत आहेत. त्यांना लवकरच पैसे मिळाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा - भंडारा; विषबाधेमुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू; ४० ते ५० जणांना विषबाधा झाल्याची शक्यता

हेही वाचा - जिल्ह्यत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन लोकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.