कोरोना नियम न पाळणाऱ्या लॉनला तहसीलदाराने ठोकले टाळे

author img

By

Published : Jun 30, 2021, 7:51 AM IST

tehsildar sealed lawn in bhandara; did not follow Corona rules

भंडारा जिल्ह्यात 28 जून पासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सुरू आहेत. या निर्बंधानुसार लग्नसमारंभासाठी केवळ पन्नास लोकांना परवानगी आहे. त्या अगोदर शंभर लोकांना परवानगी होती. मात्र प्रत्येक वेळेस लग्नसमारंभात दीडशेच्या वरून नागरिक एकत्र येतात. त्यामुळे भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी मागील तीन दिवसात दोन सभागृहांवर दंडात्मक कार्यवाही केली आहे.

भंडारा - कोरोना नियम न पाळणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः लग्न समारंभ सुरु असलेल्या गर्दीच्या ठिकाणी हे नियम पाळले जातात. की नाही, यावर प्रशासनाची करडी नजर आहे. मागील तीन दिवसांमध्ये भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दोन सभागृहावर प्रथम दंडात्मक कारवाई केली. मात्र या नंतरही नियम न पाळणाऱ्या भंडारा शहरातील श्यामसुंदर लॉनला सील केले आहे.

कोरोना नियम न पाळणाऱ्या लॉनला तहसीलदाराने ठोकले सील

सलग दोन दिवस दंडात्मक कारवाई -

सध्या भंडारा जिल्ह्यात 28 जून पासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सुरू आहेत. या निर्बंधानुसार लग्नसमारंभासाठी केवळ पन्नास लोकांना परवानगी आहे. त्या अगोदर शंभर लोकांना परवानगी होती. मात्र प्रत्येक वेळेस लग्नसमारंभात दीडशे पेक्षा जास्त नागरिक एकत्र येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या सभागृहावर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानुसार भंडारा उपविभागीय अधिकारी आणि भंडारा तहसीलदार यांनी मागील तीन दिवसात दोन सभागृहांवर दंडात्मक कारवाई केली. 26 जूनला ठाणा येथील बावनकुळे सभागृहावर दहा हजाराचा दंड ठोठावला. यापुढे अशी चुकी केल्यास सभागृह सील केल्या जाईल, अशी सूचनाही त्यांना देण्यात आली. त्यानंतर 27 जूनला श्यामसुंदर लॉन येथेही निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त नागरिक असल्याने या लॉन मालकावरही दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यापुढे नियम मोडल्यास सभागृह सील करण्यात येईल, अशा सुचना देखील करण्यात आल्या होत्या.

दुसऱ्याच दिवशी नियमांना हरताळ -

सत्तावीस तारखेला दंडात्मक कारवाई केल्यानंतर 28 तारखेला पुन्हा श्यामसुंदर लॉन येथे लग्न समारंभाचे कार्यक्रम होते. या कार्यक्रमास सुद्धा नियमांपेक्षा तिप्पट नागरिक होते. याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे आपल्या चमुसह सभागृहाच्या ठिकाणी पोहोचले असता तिथे कोरानाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे प्रत्यक्षात दिसले. एक दिवस आधी दंडात्मक कारवाई केली असल्यावरही सभागृह मालक अशा बेजबाबदार पद्धतीने वागत होता. त्यामुळे श्याम सुंदर लॉनला सील ठोकण्यात आले आहे.

नागरिकांना त्रास देणे हा उद्देश नाही -

लग्न समारंभासारख्या आनंदाच्या क्षणी जाऊन दंडात्मक कारवाई किंवा कायदेशीर कारवाई करून नागरिकांना त्रास देणे. हा हेतू आमचा नाही. मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असतील, तर कारवाई करावीच लागेल. कारण अशा बेजबाबदार पद्धतीने वागण्याने कोरोनाचा उद्रेक होईल. तो होऊ नये, त्यासाठी ही कारवाई चालू आहे, असे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, आढळला केवळ एक रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.