ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी निघाला पोलीस!

author img

By

Published : Feb 11, 2020, 9:35 PM IST

आरोपी पोलीस कर्मचारी
आरोपी पोलीस कर्मचारी

लाखनी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी हा गोंदियातील चिंचगड पोलीस ठाण्याचा कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भंडारा पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.

भंडारा - एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नीलेश हेडाऊ असे या आरोपी पोलिसाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी निघाला पोलीस


लाखनी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी हा गोंदियातील चिंचगड पोलीस ठाण्याचा कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भंडारा पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.

हेही वाचा - फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर...

पीडित मुलगी ही लाखनी येथे बारावीत शिकत आहे. 9 फेब्रूवारीला दुपारी कॉलेज आटपून गडेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग सहावर मैत्रीणीसह उभी होती. दरम्यान मैत्रीणीचे मामा आल्याने मैत्रीण निघून गेली. पीडित मुलगी एकटी उभी असताना एक पांढरी कार तिच्या समोर येऊन थांबली. गाडीतील व्यक्तीने भंडाऱ्याला जाणारा रस्ता कोणता आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिलाही गाडीत बसवले.

मुलगी गाडीत बसतात त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. पीडितेने प्रतिकार करुन गाडीचे स्टेअरिंग फिरवल्याने गाडी दुभाजकावर आदळली. त्यामुळे आरोपीने मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि पसार झाला. पीडितेने याबाबत लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीने मुलीला स्वतः पोलीस असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष देत सहा पथकं आरोपीच्या शोधासाठी तयार केले. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन आरोपी नीलेश हेडाऊ याचा शोध लावाला. स्वतः पोलीसच आरोपी निघाल्याने नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Intro:Body:Anc :- अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती हा पोलीस निघाले मिळाल्याने रक्षकच भक्षक बनला असल्याचे टीका नागरिक करीत आहेत. आरोपी पोलीस निघाल्याने खुद्द पोलिस अधिकारी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
लाखनी तालुक्यात दोन दिवसा अगोदर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुढे आली होती पोलिसांच्या तपासात हा आरोपी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलिस स्टेशन च्या कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपी पोलिसाचे नाव नीलेश हेड़ाऊ असे आहे.

भंडारा शहरात राहनारी पीड़ित मुलगी ही लाखनी येथे एका कॉलेज मध्ये 12 वर्गात शिकत आहे. 9 फेब्रूवारीला दुपारी 12 वाजता कॉलेज आटपुन राष्ट्रीय महामार्ग 6 वर गडेगाव येथे रस्त्यावर मैत्रीणीसह उभी होती. नंतर मैत्रीणीचे मामा आल्याने त्यांच्या गाडिवर बसून मैत्रीण निघून गेल्याने ती एकटी उभी होती. तेवढ्यात एक पांढरी कार तिच्या समोर येत भंडारा रोड कोणता आहे अशी माहिती विचारत किती दूर अंतर असल्याची माहिती विचारली. तू भंडारा जात असल्यास मी तुला सोडून देतो, मी स्वता पोलिस असल्याने तुला घाबरण्याचे कारण नाही तू माझ्या मुलीसारखी आहेस असा विश्वासात दिल्याने एक मुलगी त्याच्या गाडीत बसली.
मात्र मुलगी गाडीत बसतात यावरती त्या रक्षकाच्या डोक्यात भक्षक शिरला आणि त्याने तिची छेड़ काढण्यास सुरुवात केली. पीडिताने हिम्मत दाखवीत प्रतिकार सुरु केला आणि तिने गाड़ी चे स्टेरिंग फिरवल्याने गाड़ी दुभाजकावर आदळली त्यामुळे आरोपीने पुढे तिला फेकून आरोपी पसार झाला. याची तक्रार लाखनी पोलिसात केली गेली आरोपीने स्वतःची ओळख एक पोलीस दाखवल्यामुळे पोलिस अधिक्षक यात लक्ष देत 6 पथके आरोपी च्या शोधत पाठविली होती अखेर पोलिसांना तांत्रिक तपासात सुगावा लावत आरोपी नीलेश हेड़ाऊ याला अटक केली आहे. राज्यात हिंगणघाट,औरंगाबाद येथिल प्रकरण ताजे असतांना भंडारा जिल्ह्यात अल्पवयिन मुलीचे अपहरण करून बळजबरी करणाऱ्या आरोपी स्वतः पोलिस निघाल्याने मदत मागावी तर कोणाकडे असा प्रश्न समोर आला आहे. एका पोलिसावर आरोप असूनही पोलीस अधीक्षकांनी यांनी घटनेच्या 72 तासात आरोपीला अटक करून सत्यता समोर आणत अपराधी हा केवळ अपराधी असतो त्यामध्ये भेदभाव केला जात नाही हे दाखवून दिले.

1)अरविंद साळवे बाइट (पोलिस अधीक्षक),,,


2)पीड़ित Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.