ETV Bharat / state

खोटी कागदपत्रे जोडून बनावट खाते उघडणारा गजाआड

author img

By

Published : Jul 18, 2020, 5:42 PM IST

खोटी कागदपत्रे जोडून बनावट खाते उघडणारा गजाआड
खोटी कागदपत्रे जोडून बनावट खाते उघडणारा गजाआड

मूळचा लाखनी तालुक्यातील रहिवासी असलेला भूषण भैसारे याने शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी भंडारा शहरातील जलाराम चौकातील कॉर्पोरेशन बँकेत बचत खाते उघडण्याचे योजना बनविली यासाठी त्याने भंडारा शहरातील मुस्लीम लायब्ररी येथे राहणाऱ्या किशोर भोंगडे यांच्या नावाने खाते उघडण्याचा फॉर्म भरला.

भंडारा - शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट नावावर बँकेत बचत खाते उघडण्याचा प्रयत्न करणे एका तरुणाला महागात पडले आहे. कागदपत्राची पडताळणी करताना ती खोटी असल्याचे बँक अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. भंडारा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भूषण आडकू भैसारे (30) असे असून ते मानेगाव येथील रहिवासी आहेत.

खोटी कागदपत्रे जोडून बनावट खाते उघडणारा गजाआड

मूळचा लाखनी तालुक्यतील रहिवासी असलेला भूषण भैसारे याने शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी भंडारा शहरातील जलाराम चौकातील कॉर्पोरेशन बँकेत बचत खाते उघडण्याचे योजना बनविली यासाठी त्याने भंडारा शहरातील मुस्लीम लायब्ररी येथे राहणाऱ्या किशोर भोंगडे यांच्या नावाने खाते उघडण्याचे फॉर्म भरला. त्यासाठी त्याने त्या आधार कार्ड आणि लाईट बिल जोडले. बँकेने याची तपासणी केली असता आधारकार्ड नंबर आणि लाईट बिल हे बनावट असून दीपक विनायक डोकरीमारे यांच्या नावाचे होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शाखा व्यवस्थापकांना माहिती देत शाखा व्यवस्थापक गोपाल पोकळे यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

बँकेची तक्रार मिळताच गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक यांनी त्यांच्या चमूसह आरोपी भूषण भैसारे याला त्याच्या मानेगाव येथून अटक केली आहे. भूषणने या अगोदरही अशा पद्धतीचे खोटे बँक खाते उघडले होते का, त्याची किती बँक खाते आहेत त्याने खोट्या पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेतला आहे का, या सर्व गोष्टींचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी ज्या पद्धतीने भूषणने खोटे कागदपत्र दाखवून खाते उघडण्याचा प्रयत्न केलाय असाच प्रयत्न लोकांची फसवणूक करणारे भामटे सुद्धा करतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांची मूळ कागदपत्रे चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ नयेत, याची खबरदारी घ्यावी. बँकेनेही खोट्या कागदपत्रांआधारे खाते उघडणाऱ्या लोकांविरुद्ध जागरूक राहून पोलिसात त्यांची तक्रार करावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.