ETV Bharat / state

Youth Chasing Wild Elephants : चवताळलेला जंगली हत्ती व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या युवकांमागे धावला; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

author img

By

Published : Dec 2, 2022, 2:19 PM IST

हत्तींच्या कळपामागे धावत जाऊन व्हिडिओ शूटिंग (youth Video shooting chasing wild elephants ) करणे काही तरुणांच्या अंगलट आले आहे. हत्ती धावण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल (elephants running video viral on social media) होत असून नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊन त्यांचा पाठलाग (mischievous youth chasing wild elephants) करून फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चवताळलेला जंगली हत्ती व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या युवकांमागे धावला. Youth Chasing Wild Elephants

Youth Chasing Wild Elephants
जंगली हत्ती व्हिडीओ शूटिंग

भंडारा : हत्तींच्या कळपामागे धावत जाऊन व्हिडिओ शूटिंग (youth Video shooting chasing wild elephants ) करणे काही तरुणांच्या अंगलट आले आहे. हत्तीने माघार घेतली म्हणून त्या तरुणांचे प्राण वाचले अन्यथा एखादी विपरीत घटना घडली असती. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील शिवनी गावाच्या शेतशिवारात (Youth Chasing Wild Elephants) घडल्याचे वन विभागाने सांगितले आहे. दरम्यान चवताळलेला जंगली हत्ती व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या युवकांमागे धावला. हत्ती धावण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल (elephants running video viral on social media) होत असून नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊन त्यांचा पाठलाग (mischievous youth chasing wild elephants) करून फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून नका, असे अहवाल उपवन संरक्षक अधिकारी राहुल गवई यांनी केले आहे.

व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या युवकांमागे हत्ती धावला

खोडकर तरुणांकडून जंगली हत्तींचा पाठलाग : भंडारा वनविभागातील लाखनी वनपरिक्षेत्रातील बरडकिन्ही जंगलात दोन दिवस मुक्काम ठोकलेल्या हत्तींनी आज लाखनी तालुक्यातील पेंढरी जंगलाकडे मोर्चा वळवला. पेंढरीला जाण्यासाठी या हत्तींना शिवणी गावातील शेतातून आगेकूच केली. शुक्रवारी पहाटे हत्तींना शेतात पाहून काही स्थानिक खोडकर तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. व्हिडिओ बनवताना ते धावत असलेल्या हत्तींच्या अगदी जवळ आले आणि एका महाकाय हत्तीने पलटून या तरुणांचा पाठलाग सुरू केला. जीव मुठीत घेत या तरुणांनी तिथून पळ काढला काही काळ धावल्यानंतर हत्ती परत आपल्या कळपासह निघून गेल्याने या तरुणांचा जीव थोडक्यात वाचला.

हत्तींपासून लोकांना दूर राहण्याचे आवाहन : आज पहाटे काढलेला हा व्हिडिओ स्थानिक लोक वेगाने शेअर करत आहेत. त्यामुळे या हत्तींच्या मार्गावर लोकांची गर्दी जमू शकते. डीसीएफ राहुल गवई, भंडारा वनविभागाचे प्रमुख, सेजचे साग्निक सेनगुप्ता आणि मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी या हत्तींपासून लोकांनी दूर राहावे आणि इतरांनाही थांबवावे, असा इशारा दिला आहे. अशा घटनांमुळे जीवितहानी होवू शकते. वन्यजीव संस्था आणि वन्यजीव प्रेमी आणि पत्रकारांना विनंती आहे की त्यांनी लोकांना हत्तींबाबत वनविभागाच्या DOs आणि DONTs पत्रकांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे अशी जनजागृती करावे अशी विनंती केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.