ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये दुकान उघडले, कारवाईस आलेल्या पोलिसांसमोरच सलून चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

author img

By

Published : Jun 18, 2020, 8:10 AM IST

Hair salon owner attempted suicide in bhandara
अधिकारी आणि पोलिसांसमोर सलून मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

अधिकाऱ्यांनी, दुकान बंद ठेवण्याचे आदेश असताना दुकान कसे उघडे ठेवले याबाबत विचारणा केली. तसेच त्यांनी या प्रकरणी दुकानदार प्रमोद केसलकर याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेव्हा प्रमोदने जवळ उभी असलेल्या त्याच्या गाडीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि ती स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगत मी आत्महत्या करतो, असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला रोखले.

भंडारा - सलून दुकानावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना पैसे नसल्याचे सांगत, स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून दुकानदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेव्हा धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांसमोर कारवाई करावी तरी कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी अधिकाऱ्यांनी सलून दुकानदाराविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर सलून दुकानदारांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र बंदीचे आदेश असतानाही भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात प्रमोद केसरकर याचे 'झिडोस' नावे असलेले सलून बुधवारी सुरू होते. याची माहिती नगरपालिका अधिकाऱ्यांनी मिळाली. तेव्हा ते पोलीस कर्मचाऱ्यांसह दुकानात पोहोचले. त्या वेळेस दुकानात ग्राहकांची बरीच गर्दी होती.

सुधीर उरकुडे माहिती देताना....

अधिकाऱ्यांनी, दुकान बंद ठेवण्याचे आदेश असताना दुकान कसे उघडे ठेवले, याबाबत विचारणा केली. तसेच त्यांनी या प्रकरणी दुकानदार प्रमोद केसलकर याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेव्हा प्रमोदने जवळ उभ्या असलेल्या त्याच्या गाडीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि ती स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगत मी आत्महत्या करतो, असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला रोखले. या प्रकरणामुळे नगरपालिकेचे कर्मचारी चांगलेच धास्तावले. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

प्रमोद केसलकर याचे सलूनचे दुकान हे भाड्याने असून त्याला महिन्याकाठी 20 हजार रुपये भाडे द्यावे लागते. आतापर्यंत मार्चपासून त्याचे 60 हजार रुपये भाडे थकलेले आहे. या पैसासाठी मालकाने तगादा लावला. या कारणाने प्रमोदने दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. यामुळे प्रमोदने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून दुकाने बंद असल्याने सलून चालक आर्थिक अडचणीत आहेत. भंडारा जिल्ह्यत दीड हजाराच्या वर सलून दुकाने आहेत. दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना अर्ज केले होते. पण त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा - कोरोनासाठी मिळालेल्या निधीवर तहसीलदाराने मारला डल्ला, चौकशीची मागणी

हेही वाचा - लोकार्पण होण्यापूर्वी पर्यटन विभागाने बांधलेले बांधकाम कोसळले; भंडाऱ्यातील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.