भंडारा येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

author img

By

Published : Jun 27, 2021, 3:05 PM IST

BJP's Rasta Rocco agitation at Bhandara; fuss of social distance

ओबीसी राजकीय आरक्षण वाचवू न शकलेल्या राज्य सरकारच्या निषेधार्थ भंडारा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरात विधान परिषद आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर किमान अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला.

भंडारा - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात शनिवारी भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात विधान परिषद आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर किमान अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला.

भंडारा येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात -

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच तुमसर, साकोली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आला. भंडारा येथे सर्किट हाऊस पासून या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली होती. ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, ओबीसी आरक्षण आमचा हक्क आहे, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अर्धा तास आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन संपविले.

राज्यकर्त्यांकडूनच कोरोनाच्या नियमांना तिलांजली -

महाराष्ट्रात कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. एकीकडे शासन नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी सांगत आहे. तर दुसरीकडे राजकीय लोक हेच कोरोनाच्या नियमांना तिलांजली देताना दिसत आहेत. भाजपाने काढलेल्या या मोर्चातही सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता. मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्याला लाटे पूर्वीही भाजपाने अशाच पद्धतीचा देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात एक मोठा आंदोलन भंडारामध्ये केला होते. तेव्हाही सोशल डिस्टंसिंगचा असाच फज्जा उडवला होता. त्यामुळे त्या काळात आंदोलनानंतर वाढलेली रुग्ण संख्या ही आंदोलनामुळे तर वाढली नाही ना असाही प्रश्न त्या वेळेस नागरिक करीत होते. आता पुन्हा डेल्टा व्हेरीअंट येत असल्याने शासन कठोर पावले उचलताना दिसत आहे. मात्र त्यात अशा पद्धतीचे आंदोलने करून कोरोनाला पुन्हा आमंत्रण देत आहोत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - 'बायकोने मारले, तरी हे मोदींना दोषी ठरवतील'; फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.