ETV Bharat / state

खुशखबर! बुलडाण्यानंतर आता भंडारा जिल्हादेखील कोरोनामुक्त

author img

By

Published : May 10, 2020, 9:01 PM IST

bhandara district corona news
भंडारा जिल्हा कोरोना न्युज

भंडारा जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे ताजे दोनही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे.

भंडारा - जिल्हा हा आज रविवारपासून कोरोना मुक्त झाला आहे. जिल्ह्यात असणाऱ्या एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे दोन्ही चाचण्यांचे अहवाल रविवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे रुग्णासह सर्व प्रशासनाने देखील सुटकेचा नि: श्वास टाकला. भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गराडा येथील सदर रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु होते. १४ ते १५ दिवसानंतर त्याचे स्व‌ॅब (घशातील स्त्रावाचे नमुने)‌‌ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. ते अहवाल आज प्राप्त झाले.

हेही वाचा... दिलासादायक..! बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त, आतापर्यंत सर्व २३ रूग्णांना डिस्चार्ज

कोरोना विरोधात भंडारा प्रशासनाची यशस्वी लढाई...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ६०६ व्यक्तींचे स्व‌ॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी ५६९ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. आजच्या तारखेत (10 मे) नागपूर येथे जिल्ह्यातील ३६ नागरिकांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे १८९ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील २० हजार ७२८ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात आला आहे, अशा नागरिकांनी २८ दिवस घराबाहेर पडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिले आहेत.

हेही वाचा... नागपुरात 24 तासात 15 नवीन कोरोनाबाधित रुग्ण, एकूण आकडा तिनशेच्या उंबरठ्यावर

भंडाऱ्यात आतापर्यंत तीव्र श्वास दाहाच्या तक्रारीमुळे एकूण ११७ व्यक्तींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच ११६ व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे (स्व‌ॅब) नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ११५ व्यक्तींचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७२ हजार ९७६ नागरिकांनी 'आरोग्य सेतू' या अ‌ॅप्लिकेशन डॉउनलोड केले आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये गराडा बुद्रुक येथील एक रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळला होता. त्याचे दोन चाचण्यांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे 'फ्लू ओपीडी' सुरु करण्यात आली आहे. गावपातळीवर घरोघरी आशा आणि अंगणवाडी सेविकांमार्फत आयएलआय आणि सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.