ETV Bharat / state

आरोग्य वर्धिनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गरोदर महिलांसाठी ठरत आहे धोक्याचे ठिकाण

author img

By

Published : Jul 25, 2020, 2:15 PM IST

या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांना लसीकरण, लहान मुलांचे लसीकरण, महिलांची आरोग्य तपासणी, स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात महिला आणि मुले याठिकाणी येतात. तसेच ई-पाससाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र या ठिकाणी मिळत असल्यामुळे त्याच वेळेवर वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही येतात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडत आहे.

Arogya Vardhini Nagari Primary Health Center is a dangerous place for pregnant women
आरोग्य वर्धिनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गरोदर महिलांसाठी ठरत आहे धोक्याचे ठिकाण

भंडारा - नगरपालिकेतर्फे चालविण्यात येणारा आरोग्य वर्धनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला, स्तनदा माता, लहान मुलांसाठी कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. ई-पाससाठी आवश्यक असलेले आरोग्य प्रमाणपत्र घेणाऱ्यांची या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या महिला आणि मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांना लसीकरण, लहान मुलांचे लसीकरण, महिलांची आरोग्य तपासणी, स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात महिला आणि मुले याठिकाणी येतात. तसेच ई-पाससाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र या ठिकाणी मिळत असल्यामुळे त्याच वेळेवर वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही येतात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्यांना लवकर होऊ शकतो त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि या लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सर्वांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर निघू नये असे शासनाचे निर्देश आहे. मात्र एकीकडे शासन नागरिकांना काय करावे आणि काय करु नये याची नियमावली सांगण्यात येते तर दुसरीकडे या नियमांची अंमलबजावणी करणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीच या नियमांना केराची टोपली दाखवत असतात.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : एम्स,ट्रिपल आयटी आणि आयआयटी जोधपूरच्या संशोधनातून कोविड ट्रॅकरची निर्मिती

वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची रांग आणि उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलांची रांग ही अगदी जवळजवळ असते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील एखादा व्यक्ती जर कधी कोरोना रुग्ण असल्यास त्याचा प्रादुर्भाव या महिलांना आणि मुलांना लगेच होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हे अतिशय धोक्याचे ठरणार आहे. याविषयी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना विचारले असता, यापुढे याबाबत काळजी घेतली जाईल आणि ज्या दिवशी लसीकरण असतील त्यादिवशी नागरिकांचे प्रमाणपत्र मिळण्याची वेळ ही बदलवली जाईल आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.