ETV Bharat / state

अज्ञातांकडून परळी वैजनाथ शहरातील वाहनांची नासधूस

author img

By

Published : Jun 13, 2021, 3:43 PM IST

Updated : Jun 13, 2021, 4:46 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात शनिवारी (दि. 13 जून) मध्यरात्री दोन गुंडांनी धुमाकूळ घातला असून जुन्या गाव भागातील चारचाकी, तीन चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे.

परळी वैजनाथ (बीड) - शहरात शनिवारी (दि. 13 जून) मध्यरात्री दोन गुंडांनी धुमाकूळ घातला असून जुन्या गाव भागातील चारचाकी, तीन चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे.

घटनास्थळ

शहरातील जुन्या गाव भागातील तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार, अंबेवेस आदी भागात आपापल्या घरासमोर, गल्लीत लावलेल्या वाहनांची दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी लोखंडी रॉडच्या साहायाने नासधूस केली आहे. वाहनांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. विशेष म्हणजे रस्त्याने आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.

गुंडांना ताब्यात घेऊन आर्थिक मदत देण्याची मागणी

कोरोनामुळे रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात या गुंडांनी रिक्षांसह विविध वाहनांच्या काचा फोडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई करावी व आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसान झालेल्या वाहन चालकांनी केली आहे.

बंद सीसीटीव्हीचा गुंडांकडून फायदा

शहरात गाजावाजा करुन सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सीसीटिव्ही बंद असल्याचा फायदा या गुंडांनी उचलला असल्याची चर्चा होत आहे.

हेही वाचा - विवाहितेला डांबून मारहाण; गेवराई तालुक्यातील घटना

Last Updated :Jun 13, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.