ETV Bharat / state

Beed District Central Bank Scam : बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा थांबेना, मयताच्या खात्यातील ६२ हजार ४५० रूपये गायब

author img

By

Published : Jan 21, 2023, 3:51 PM IST

Beed District Central Bank
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत मयताच्या खात्यातून परस्पर ६२ हजार ४५० रूपये काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातील कानडीघाट येथील मयत शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके याच्या खात्यातील रक्कम लाटल्याचा प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत उघडकीस आला आहे. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मयताला जिवंत दाखवून जमा रक्कम काढण्यात आली आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा थांबेना

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा काही संपेना. बीड तालुक्यातील कानडीघाट येथील मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे यांच्या खात्यातील १ लाख रूपये परस्पर खात्यातमधुन गायब झाले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच पुन्हा त्याच गावातील कानडीघाट येथील दुसरे शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या खात्यावरील ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढण्यात आले. आहे. ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जमा रक्कम उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एकुण ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढले : बीड तालुक्यातील कानडीघाट येथील शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांचा २ सप्टेंबर २०१९ रोजी मृत्यु झाला आहे. त्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत खाते क्रमांक ००१३११००२०१०७५३ असून त्या खात्यावरील त्यांच्या मृत्यूनंतर११ ऑक्टोबर २०१९. २ हजार रूपये तसेच १४ नोव्हेंबर २०१९ २ हजार रूपये, २३ डिसेंबर २०१९ रोजी १६ हजार, ४ मार्च २०२० रोजी ७ हजार रूपये, ०५ मे २०२० रोजी ५ हजार ७०० रूपये, २० ऑगस्ट २०२० रोजी २ हजार रूपये, ३१ डिसेंबर २०२० रोजी २ हजार रूपये, १५ मार्च २०२१ रोजी ३ हजार ४०० रूपये १९ मे २०२१ रोजी २ हजार रूपये, १७ ऑगस्ट २०२१ रोजी २ हजार रूपये, ०४ जानेवारी २०२२ रोजी २ हजार रूपये, १२ जानेवारी २०२२ रोजी १४ हजार ३५० रूपये, ०४ जुन २०२२ रोजी २ हजार रूपये असे एकुण ६२ हजार ४५० रूपये परस्पर खात्यातमधुन उचलण्यात आले आहेत.

महात्मा फुले कर्जमुक्ती गैरव्यवहार प्रकरणात ३ कर्मचारी निलंबित : बीडच्या गोलंग्री येथील शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिले होते. काल १९ जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली असून चौसाळा शाखेतील ३ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये शाखाधिकारी प्रताप बीडकर, तपासणीस ज्ञानोबा जोगदंड, रोखपाल प्रताप कुडके हे तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून घोटाळ्याची मालिकाच हळूहळू बाहेर पडत आहे.

चौसाळा शाखेची एसआयटी मार्फत चौकशी करा : चौसाळा शाखेत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत आहे. त्यांची S.I.T. मार्फत चौकशी करा. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत आधिकारी-कर्मचारी आणि दलाल यांचे रॅकेट कार्यरत असुन अडाणी शेतकऱ्यांची खात्यावरील रक्कम परस्पर उचलून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. त्यामुळेच संबधित प्रकरणात SIT मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मत : शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. चौसाळा शाखेतील 12 शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या परस्पर उचलण्यात आले आहे. या ठिकाणी असणारे दलाल व सोसायटीचे सचिव यांनी उचलले होते. संबंधित प्रकरणात आम्ही उपनिबंधक यांना तक्रार केल्यानंतर चौसाळा शाखेतील तीन व्यक्तींना निलंबित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये शाखा अधिकारी प्रताप बीडकर तपासणीस ज्ञानोबा जोगदंड रुपाल प्रताप कुडके या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जे मयत व्यक्ती आहेत, त्याच व्यक्तीच्या नावावर पैसे उचललेले आहेत. ग्यानबा झोडगे नावाच्या मयत व्यक्तीच्या नावावर पैसे उचलले आहेत. यामध्ये धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या नावावर 65 हजार रुपये उचलण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये फार मोठे रॅकेट असल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचा - Sexbot Gets Stuck Like This : सावधान आपली एक चूक धोकादायक ठरु शकते, सेक्सबॉट्सच्या खेळात असे अडकत आहेत सामान्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.