ETV Bharat / state

Runner Avinash Sable : ऑलिम्पियन धावपटू आविनाश साबळेला क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Nov 16, 2022, 1:07 PM IST

Runner Avinash Sable
धावपटू आविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

बीड जिल्ह्यातील ऑलिम्पियन धावपटू आविनाश साबळेला (Olympian runner Avinash Sable announced) क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार (Arjuna Award in field of sports) जाहीर झालेला आहे. 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बीड : महाराष्ट्राचा स्वाभिमान, बीड जिल्ह्याची शान, आष्टी तालुक्याचा अभिमान, मांडवा गावची शान असलेल्या ऑलिम्पियन धावपटू आविनाश साबळे (Olympian runner Avinash Sable announced) याला क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार (Arjuna Award in field of sports) जाहीर झालेला आहे. 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Runner Avinash Sable
धावपटू आविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार जाहीर



अॅथलेटीक्स स्पर्धेत रचला इतिहास : टोकियो ऑलिम्पिकनंतर, महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बीड जिल्ह्यातील मांडवा गावात आपल्या वडिलांना शेती कामात मदत केली, शेतात राबला. पण अविनाशला करोना झाला. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसीक चक्रात तो अडकला होता. मात्र आता जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाशने इतिहास रचला. या स्पर्धेत अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी झाला होता. तसेच अविनाशने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Runner Avinash Sable
धावपटू आविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार जाहीर


रौप्यपदकाचा मानकरी : अविनाशची ३००० मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशने ८:११.२० सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. भारत आणि केनिया यांच्यामध्ये यावेळी कडवी झुंज पाहायला मिळाली, चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. त्यावेळी अविनाश रौप्यपदक पटकावेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि थेट रौप्यपदकाला गवसणी घातली.

Runner Avinash Sable
Runner Avinash Sable

स्टीपलचेसमधील पहिलेच पदक : आतापर्यंत एकाही भारतीयाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये पदक जिंकता आले नव्हते. पण अविनाशने यावेळी कमालच केली. ही शर्यत पाहताना अविनाश पदक जिंकेल, असे कोणला वाटले नव्हते. पण अविनाशने यावेळी विचारपूर्वक कामगिरी केली. कोणत्या क्षणी काय करायचे? हे त्याने ठरवले होते. त्यामुळेच त्याला रौप्यपदक पटकावता आले आहे. भारताचे हे स्टीपलचेसमधील पहिलेच पदक आहे. १९९४ नंतर या प्रकारात पदक जिंकणारा अविनाश हा पहिला बिगरकेनियन धावपटू आहे, हे त्याच्या यशाचे वैशिष्ट्य ठरेल. अविनाशला अंतिम फेरीत रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि दोनदा विश्वविजेत्या कॉन्सेस्लस किप्रुटो तसेच २०१८च्या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या अब्राहक किबीवोट या केनियाच्या धावपटूंचे कडवे आव्हान होते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.