ETV Bharat / state

लिंबागणेश ग्रामपंचायतीचा आदर्श; कोरोना संदर्भाने काम करणार्‍या अंगणवाडी सेविका, ग्रा.पं. कर्मचार्‍यांना विमा कवच

author img

By

Published : Apr 15, 2020, 8:49 AM IST

ग्रामीण भागात स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणार्‍या या बांधवांना देखील विम्याचे कवच असले पाहिजे म्हणून भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश ग्रामपंचायतने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पाणी पुरवठा, स्वच्छता कर्मचारी यांना 25 लक्ष रूपये विम्याचे कवच दिले आहे.

लिंबागणेश ग्रामपंचायतीचा आदर्श
लिंबागणेश ग्रामपंचायतीचा आदर्श

बीड - कोरोना विषाणूच्या भीषण संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्या बरोबरीनेच ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी काम करत आहेत. गावाचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी योगदान देणार्‍या आशा, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना कोरोना साथीत 25 लक्ष रुपयांच्या विम्याचे कवच भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश ग्रामपंचायतीने दिले आहे. अशा पध्दतीने ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पातळीवर कोरोनाशी लढणार्‍या कर्मचार्‍यांना विम्याचे कवच देणारी लिंबागणेश ही एकमेव ग्रामपंचायत आहे.

कोरोना संसर्गाच्या साथीमुळे सध्या सारे जग बेजार झाले आहे. अमेरिका, इटली, चीन अशा प्रगत देशांना गुडघे टेकायला लावणारी ही साथ वेळीच आटोक्यात यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव हे कोरोनाशी लढा देत आहेत. ग्रामीण भागात मात्र, कोरोनाशी दोन हात करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पाणी पुरवठा, स्वच्छता कर्मचारी यांच्यावर आहे.

ग्रामीण भागात स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणार्‍या या बांधवांना देखील विम्याचे कवच असले पाहिजे म्हणून भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश ग्रामपंचायतने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पाणी पुरवठा, स्वच्छता कर्मचारी यांना 25 लक्ष रूपये विम्याचे कवच दिले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचार्‍यांना विम्याचे कवच देणारी लिंबागणेश ही ग्रामपंचात पहिली ग्रामपंचायत असून भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, ग्रामसेवक तेलप सर, शंकर वाणी यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.