ETV Bharat / state

Farmer Suicide : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; आंब्याच्या झाडाला गळफास

author img

By

Published : Dec 21, 2022, 5:09 PM IST

Farmer Suicide
शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली ( Indebtedness Farmer Suicide By Hanging ) आहे. शेतकऱ्याचे बॅंकेत दिड लाख कर्ज ( One And Half Lakh Farmer Bank Loan ) होते. ते फेडता आले नाही. आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपवले.

बीड : बीडच्या कळसंबरमध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली ( Indebtedness Farmer Suicide ) आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यात 1 वर्षात 265 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले ( 265 Farmers Suicide In Beed )आहे.

Farmer Suicide
शेतकऱ्याची आत्महत्या

बीड जिल्ह्यात 265 शेतकऱ्यांची आत्महत्या : बीड जिल्ह्यात गेल्या एक जानेवारी ते आजपर्यंत 265 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर त्यामध्ये पात्र आत्महत्या या 183 असून अपात्र आत्महत्या या 43 आहेत. काल रात्री बीड तालुक्यातील कळसंबर येथील शेतकरी सुग्रीव भिमराव वाघमारे वय ५५ वर्षे यांनी रात्री ११ च्या दरम्यान कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या ( Farmer Suicide By Hanging ) केली.

आंब्याच्या झाडाला गळफास : शेतकरी सुग्रीव भिमराव वाघमा गेल्या काही वर्षांपासून नापिकीमुळे झालेले नुकसान आणि कर्जाचा झालेला डोंगर या बाबीला कंटाळले होते. काल दि‌.२० डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ च्या दरम्यान स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर नेकनुर येथील एस.बी.आय बॅंकेचे दिड लाख रुपये कर्ज ( One And Half Lakh Farmer Bank Loan ) आहे. तर इतर खाजगी व्यवहार देखील असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नेकनुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामाकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, १ सुन, २ नातवंडे असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.