ETV Bharat / state

परळीतील टरबुजाची दुबईला निर्यात; बलभीम मुंडेंनी आधुनिक तंत्रज्ञानातून साधली किमया

author img

By

Published : Apr 14, 2021, 7:48 PM IST

शेतात लागवड केलेल्या टरबूजाची निर्यात थेट दुबईत होत असल्याने मुंडेंनी शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

टरबूज पीक
टरबूज पीक

परळी (बीड) - कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक मंदी असून सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. याला शेती व्यवसाय देखील अपवाद नाही. मात्र नाथ्रा येथील प्रयोगशील शेतकरी बलभीम मुंडे अपवाद ठरले आहे. शेतात लागवड केलेल्या टरबूजाची निर्यात थेट दुबईत होत असल्याने मुंडेंनी शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

परळीतील नाथ्रा येथे बलभीम मुंडे नावाचे प्रयोगशील शेतकरी आहे. ते एलआयसी मधील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी 30 वर्षाच्या सेवेत अनेक शेतीप्रयोग आणि पिकांची माहिती जाणून घेतली. मुंडेंकडे एकूण तेरा एकर शेत जमीन आहे. त्यातील काही भागात टरबूज पिकाची लागवड करुन त्याचे संगोपन केले. आणि जवळपास 10 ते 12 किलोपर्यंतच्या टरबूजाचे उत्पादन घेतले. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचादेखील उपयोग केला. मुंबईतील व्यापारी शेतपर्यंत येऊन फळांची निर्यात दुबईला केली जाते. प्रत्येक फळांची किंमत 70 ते 80 रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

शेततळ्यात मत्स बीजाचे देखील उत्पादन

गावी शेती असूनही त्यांनी नोकरीमुळे शेतीत फारसे लक्ष दिले नाही. जून २०२०मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर परळी येथे घर उभारले. त्यानंतर शेती कामांत पूर्णवेळ झोकून दिले. मुंडेंनी एका एकरात शेततळे उभारले. हे शेततळे आधुनिक पद्धतीचे असून याची खोली अठ्ठावीस फूट आहे. तसेच सव्वा कोटी लीटर पाणी साठवण क्षमता आहे. त्यात त्यांनी २५ हजार मत्स्यबीज सोडले असून काही दिवसांतच ते विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यातून एकूण वीस टन मच्छी उत्पादन होणार असल्याचे मुंडेंनी सांगितले.

सीताफळ आणि पेरुची लागवड

मुंडे यांनी अडीच एकर शेतीमध्ये पेरू व तीन एकर शेतीमध्ये सिताफळ लागवड केली आहे. सरदार व तैवान वानाचे पेरूचे रोपे आहेत. तसेच एन. एम. के. १ या जातीची सिताफळ लागवड केलेली आहे. पेरूचे फळ हे चौदा महिन्यानंतर तर सीताफळ हे बत्तीस महिन्यानंतर तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिताफळ पिकात त्यांनी हळदीचे आंतरपीक तर पेरू पिकात फूल गोबी व पत्ता गोबीचे आंतरपीक घेत आहेत. तसेच केळीचा बागही त्यांनी लावला आहे. सर्व शेत पिकांना ते ठिंबक सिंचन द्वारेच पाणी देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.