बीड : डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे गर्भवती महिलेशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 1, 2021, 3:10 PM IST

representative image

गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा बहाणा करून डॉक्टरने सोनोग्राफी सेंटरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीड - गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा बहाणा करून डॉक्टरने सोनोग्राफी सेंटरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना धारूरमध्ये मंगळवारी दुपारी घडली. सदरील डॉक्टर भूलतज्ज्ञ असून, धारूरचा भाजपचा नगराध्यक्ष आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉ. स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे ६०) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

हेही वाचा - माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची हेडगेवार निवासस्थान आणि संघ मुख्यालयाला भेट

  • धारूर येथील घटना -

डॉ. हजारी हा धारूर नगरपालिकेत सध्या नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून, धारूरमध्येच तो खासगी दवाखाना चालवतो. मंगळवारी दुपारी एक गर्भवती तपासणीसाठी तेथे आली होती. तिला सोनोग्राफी करायची असा बहाणा सांगत सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला.

  • डॉक्टरवर गुन्हा दाखल -

हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर पोलीस ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत.

हेही वाचा - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.