ETV Bharat / state

"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करूया"

author img

By

Published : Apr 30, 2021, 6:00 PM IST

पालकमंत्री धंनजय मुंडे
पालकमंत्री धंनजय मुंडे

उद्या 1 मे रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मर्यादित निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत व साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

बीड - महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापक कोविड लसीकरण मोहीम हाती घेतली असून वय वर्ष 18 ते 44मधील सर्व नागरिकांना आता मोफत लस देण्यात येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या व्यापक लसीकरण मोहिमेस पाठबळ देण्यासह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वातावरणात वाढती उन्हाची दाहकता आणि त्यात रोज वाढणारी संसर्गाची आकडेवारी एकीकडे चिंताजनक रूप धारण करत आहेत. त्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कष्ट घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्वव्यापी लसीकरण मोहिमेत पात्र असणाऱ्या प्रत्येकाचे वेळेत लसीकरण व्हावे, यासाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. याचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्राला कोणत्याही कठीण परिस्थितीवर कणखरपणे मात करण्याची परंपरा राहिलेली आहे, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी या भूमीला आपल्या घामाचे मोल देऊन जोपासले व समृद्ध केलेले आहे. याचा अभिमान बाळगून आज या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे व आपापली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे, असेही मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. उद्या 1 मे रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मर्यादित निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत व साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.