ETV Bharat / state

घाटनांदूर येथे जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

author img

By

Published : May 30, 2021, 12:06 PM IST

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्ण सेवेत अडचणी निर्माण होत असल्याने, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोट्यातील निधीतून वातानुकूलीत व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आठ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.

घाटनांदूर- (बीड) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्याहस्ते शनिवारी घाटनांदूर (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

जिल्हा रुग्णवाहिकेची अवस्था दयनीय

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्ण सेवेत अडचणी निर्माण होत असल्याने, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोट्यातील निधीतून वातानुकूलीत व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आठ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे आठ रुग्णवाहिका

आठ रुग्णवाहिकांमधील चार रुग्णवाहिका अंबाजोगाई तालुक्यात रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या असून, माजलगाव तालुक्यातील मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रास ,वडवणी, धारूर, शिरूर कासार, कडा येथील रुग्णालयास देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जि. प. अध्यक्षा सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सिरसाट म्हणाल्या, जिल्ह्यात पंचावन्न प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सर्वच केंद्रास टप्प्याने वातानुकूलित व आरोग्य सुविधा असलेल्या सुसज्ज रुगवाहिका देण्यात येणार आहेत. तर लवकर आणखी पंचवीस रुग्णवाहिका मिळणार आहेत. तसेच घाटनांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लवकर दर्जा वाढ देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिवाजी सिरसाट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे,गोविंद देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात...राज्यात 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.