ETV Bharat / state

Child Marriage : पत्‍नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेला, अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला

author img

By

Published : Jan 31, 2023, 4:13 PM IST

Updated : Jan 31, 2023, 4:25 PM IST

बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या तेराव्या वर्षीच मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय 34 वर्ष या विवाहित तरुणान बायको हरल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र, तोच पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पतीसह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

तत्वशिल कांबळे यांची प्रतिक्रिया

बीड : बाल हक्क समितीच्या सदस्य प्रज्ञा खोसरे यांनी धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात अनेक ऊसतोड कामगार आपली पोटाची खळगी भरण्यासाठी इतर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यामुळे उसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. एक जण बायको हरल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गोला होता. मात्र तोच पोलिसांच्या तावडीत सापडला.

काय आहे प्रकार : आतापर्यंत आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती हरवल्याची तक्रार दिली तर, त्यांना ती व्यक्ती सापडल्याच्या घटना, बातम्या पाहिल्या असतील. मात्र, एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणे चांगलचे महागात पडले आहे. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह झाला तर अल्पवयातच मुलीचे लग्न झाल्यानंतर, तिला एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. मात्र, तरी देखील बालविवाह लावले जातात.

बालविवाहामध्ये दुसरा क्रमांक : महाराष्ट्रात बीड जिल्हा हा बालविवाहामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे सगळं असताना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या तेराव्या वर्षीच मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय 34 वर्ष या विवाहित तरुणाने तक्रार दिली की, माझी 19 वर्षीय पत्नी हरवली आहे. तीचा आम्ही शोध घेतला मात्र, आम्हाला ती मिळून आली नाही. त्यामुळे तिचा तपास करावा अशी विंनती त्यांने पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर धारुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजय आटोळे यांनी तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान ती अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री येथे परळीच्या रोहित लांबूटे या तरुणासोबत सापडली आहे.

बालविवाह : त्यानंतर पोलिसांनी विवाहितेसह तिच्यासोबत असणाऱ्या रोहित लांबूटेला धारूर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली असता ती स्वतःहून रोहित लांबूटे याच्यासोबत गेल्याचे तिने सांगितले. मात्र, या दरम्यान पोलिसांना संबंधित विवाहितेचे वय कमी असल्याचा संशय आल्याने, तिच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या आधार कार्डवर तिची जन्मतारीख 24 एप्रिल 2008 असून ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. तर याविषयी पोलिसांनी विवाहितेच्या शाळेत जाऊन चौकशी केली, असता ती केवळ 14 वर्ष 9 महिन्याची असल्याचे समोर आले आहे.

फिरवली तपासाची चक्रे : माहिती समोर येतात धारुर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी, दीक्षा चक्रे यांच्या फिर्यादीवरून, बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये, 34 वर्षीय पती कृष्णा शेटे याच्यासह, बालविवाह लावून देणारे अल्पवयीन विवाहितेच्या मामा-मामी, आई-वडील, भाऊ, पतीच्या आईसह नातेवाईकांवर, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाचा गुन्ह्यात अडकला असा प्रकार कृष्णा शेटे यांच्या बाबतीत घडला आहे. कृष्णा शेटे याने बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र माहिती असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे त्याने लपवून ठेवले.

आणि आरोपी बनले : यामुळे तक्रार द्यायला गेले आणि आरोपी बनले, अशी गत कृष्णा शेटे यांची झाली आहे. तर विवाहितेसोबत सापडलेल्या रोहित लांबूटे याच्या विरोधात तक्रार नसल्याने तो अलगद बाजूला निघाला आहे. दरम्यान या सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चाइल्डलाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली. बायको हरवल्याची तक्रार देणे पती असणाऱ्या कृष्णा शेटेला चांगलेच महागात पडले. अल्पवयात मुलीचे हात पिवळे करणाऱ्या 10 व्यक्तींच्या हातात पोलिसी बेड्या ठोकल्या आहे. यामुळे या बालविवाहाची अनोखी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

14 वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह : बीड जिल्हा म्हटले की, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अनेक लोक ऊस तोडणीसाठी जवळपास पाच ते सहा महिने आपले घरदार सोडून बाहेर जातात. त्यामुळे मुलींचे लग्न 14 /15 वर्ष वयोगटात केले जातात. असाच विवाह धारूरमध्ये घडला आहे. दोन वर्षांपूर्वी 14 वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह नातेवाईकांनी लावून दिला होता. काही दिवसापूर्वी विवाहीता हरवली होती. तीची तक्रार देण्यासाठी पती पोलिसांत गेला असता हा प्रकार उघडकील आला.

कायदा काय सांगतो : कायद्याच्या दृष्टिकोनातून मुलीचे वय 18 वर्ष तसेच मुलाचे वय 21 वर्ष पाहिजे. त्या आगोदर जर विवाह केला असेल तर, त्याला बालविवाह म्हणतात. कायद्याच्या दृष्टीने भारतात गुन्हा आहे. मात्र, तरी देखील बालविवाह लावल्या जातात. कायद्याच्या दृष्टीने बालविवाह लावणाऱ्या नातेवाईकांसह आई-विडिलांवर गुन्‌हा दाखल करता येतो.

56 टक्के बाल विवाह : बीड जिल्ह्यात फार बालविवाह झालेले आहेत. कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. सदरील पीडितेचे वय 14 वर्षे असतांना लग्न लावण्यात आले. आपल्याकडे मुलींची शाळेमधली पटसंख्या किंवा महाविद्यालयातील पटसंख्या असेल यामध्ये फार तफावत आढळून येते. कारण आठवीमध्ये शिकणारी मुलगी ही पुन्हा दहावीमध्ये दिसत नाही. व दहावीमध्ये शिकणारी मुलगी कॉलेजमध्ये दिसत नाही. युनिसेफच्या आकडेवारी नुसार 56 टक्के मुलींचे विवाह बालविवाह होत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - Budget 2023 : कोविडच्या 3 वर्षानंतर आयकर मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा; निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प

Last Updated :Jan 31, 2023, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.