ETV Bharat / state

Beed Accident News : बीडमध्ये अपघातांचे सत्र सुरुच, दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:13 AM IST

Beed Accident News
Beed Accident News

Beed Accident News : बीड जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळं बीड जिल्हा हादरुन गेलाय.

बीड Beed Accident News : बीडच्या कडा- धामणगावकडून अहमदनगरकडे जाताना वळण घेणाऱ्या ट्रकला नगरच्या दिशेनं रूग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेनं पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झालाय. हा अपघात बीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगावदवळ बुधवारी रात्री साडेअकराच्या घडला. तर दुसऱ्या अपघातात जिल्ह्यातील आष्टी फाटा इथं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल उलटून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. हा अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलाय. या दोन अपघातांच्या घटनांनी बीड जिल्हा हादरलाय.

पहिला अपघात : पहिल्या अपघातात आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव परिसरात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र. MH 21 X 8600) हा धामणगावहून अहमदनगरच्या दिशेनं जात होता. दरम्यान व्यंको कंपनीकडं डाव्या बाजूनं वळण घेत असताना या ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेनं (क्र. MH 16 Q 9507) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, यांच्यासह रुग्णवाहिकेतील मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरच्या मॅक केअर हॉस्पीटल इथं उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना अहमदनगर इथं दवाखान्यात रवाना केलं.

दुसरा अपघात : दुसऱ्या अपघातात मुंबईहून बीडकडं जात असलेली सागर ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्यानं उलटल्याची घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी फाटानजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान घडलीय. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. यातील जखमींवर आष्टी जामखेड इथं उपचार सुरू आहे. आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

  1. Bunny Festival 2023 : बन्नी उत्सवाच्या आनंदावर विरजण; तीन भाविकांचा बळी, लाठीमारात 100 भाविक जखमी
  2. Mumbai Traffic Police News : मुंबईतून वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन गेली चोरीला..अपघात झाल्यानं फसला डाव
  3. Jalna Accident : भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीला चिरडलं; पेट्रोल भरायला जाणाऱ्या बाप लेकासह तिघांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.