बारामती तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Aug 15, 2022, 4:10 PM IST

अक्षय सुरेश कदम

चोरांची धास्ती घेऊन एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे उघडकीस आली आहे अक्षय सुरेश कदम असे या तरुणाचे नाव आहे याबाबत अक्षय याचा मावस भाऊ शेखर संजय शेलार (रा पारगाव ता दौंड ) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे

बारामती ( पुणे ) - चोरांची धास्ती घेऊन एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे उघडकीस आली आहे अक्षय सुरेश कदम असे या तरुणाचे नाव आहे याबाबत अक्षय याचा मावस भाऊ शेखर संजय शेलार (रा पारगाव ता दौंड ) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे

मोल मजुरीचे काम करत असणाऱ्या अक्षयला मागील चार-पाच दिवसांपासून विचित्र स्वप्न पडत होती घटनेदिवशी चोर आले आहेत व मला मारणार आहेत असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगत होता कुटुंबीयांनी त्याची समजूत काढत घरातील एका खोलीत झोपण्यास सांगितले मात्र अक्षयचा मनातून त्याचे विचार गेले नाहीत घराची दारे व खिडक्या बंद करून त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत दार उघडले नसल्याने आत डोकावून पाहिले असता अक्षयने गळफास घेतल्याचे दिसून आले

हेही वाचा - सू की यांच्यावर आणखी भ्रष्टाचाराचे आरोप म्यानमारच्या न्यायालयाने आधीच ठरवले आहे दोषी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.