ETV Bharat / state

Beed Accident News: बीड जिल्ह्यात दोन अपघातात 3 ठार; ट्रॅव्हल्सने दोघांना चिरडले, तर दुसऱ्या घटनेत टेम्पोने दिली दुचाकीला धडक

author img

By

Published : Apr 20, 2023, 2:08 PM IST

Beed Accident News
बीड जिल्ह्यात अपघात

बीड जिल्ह्यात दोन भीषण अपघात झाले. या अपघातांमध्ये तीनजण ठार झाले. एका घटनेत ट्रॅव्हल्सने दोघांना चिरडले. दुसऱ्या घटनेत टेम्पोने दुचाकीला धडक दिली.

बीड : अहमदपूर अहमदनगर रस्त्यावर रात्री दहा वाजता झालेल्या अपघातात दोन तरुण जागेवर ठार झाल्याची घटना घडली होती. मात्र त्यांची ओळख न पडल्यामुळे पोलिसांपुढे आव्हानच होते. मात्र आज सकाळी दुचाकी क्रमांक 25 जे 2856 या गाडीच्या नंबरवरून मृतांची ओळख पटवण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. हे दोन्ही तरूण कळंब येथील आहेत. विकास पवार व मित्र विजय आव्हाड हे दोघेजण केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे यात्रेनिमित्त आले होते.

खाजगी बसने चिरडले : दर्शन आटपुन ते कळंबकडे निघाले असताना अहमदपूर अहमदनगर रस्त्यावरील सांगवी पाटी येथील पुलावर लातूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका खाजगी बसने त्यांना चिरडले, तर खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच-24 एफ 7576 असा आहे. हे दोन्हीही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या केज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


टेम्पोने दिली दुचाकीला धडक : परळी मार्गावर असलेल्या दिंद्रुड येथे काम अटपुन घराकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिंद्रुड येथे घडली. अशोक पांडुरंग ठोंबरे (वय 32) यांचे दिंद्रुडपासून जवळच असलेल्या बेलोरा फाट्यावर दुकान आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद करून अशोक ठोंबरे आणि दुकानात काम करणारा हमाल कांतीलाल खिराडे हे दुचाकीवरून गावाकडे येत होते.

दुचाकीचा चुरडा : बीड परळी महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलावर भरधाव टेम्पोने एमएच- 14 के 9315 या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. जवळपास 1 किलोमीटर फरपटत नेले, यात दुचाकीवरील अशोक ठोंबरे यास माजलगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. नंतर संभाजीनगर येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तर कांतीलाल खिराडे यांच्यावर उपचार सुरू आहे. याची प्रकृती स्थिर आहे. हा इतका भीषण होता की, दुचाकीचा चुरडा झाला आहे. संबंधित टेम्पोचालक फरार आहे, पुढील तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Raigad Bus Accident: बस अपघातामध्ये मृत्यू झालेल्या आठ वर्षाच्या वीरचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, ढोलवादनात दिसून येतो उत्साह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.